Goa Assembly Monsoon Session 2023 : जिलेटिन स्फोटामुळे बांध फुटले : आमदार मायकल लोबो

खाऱ्या पाण्यामुळे शेतीवर परिणाम
michael lobo
michael loboDainik Gomantak
Published on
Updated on

Michael lobo In Goa Assembly Monsoon Session 2023 : मासेमारीसाठी जिलेटिनचा वापर केला जातो. त्याच्या स्फोटात शेतीचे बांध फुटतात आणि शेतजमीन पाण्याखाली बुडते. त्यामुळे असे प्रकार करणाऱ्यांवर आधी कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी विधानसभेत केली.

आमदार राजेश फळदेसाई यांनी याविषयी मूळ प्रश्न विचारला होता. कृषिमंत्री रवी नाईक यांनी शेतकरी संघटनांनी बांधबंदिस्तीकडे लक्ष दिले पाहिजे आणि असे गैरप्रकार मामलेदारांच्या नजरेस आणून दिले पाहिजेत, असे नमूद केले.

michael lobo
Goa Assembly Monsoon Session 2023 : ‘सोलर स्मार्ट सिटी’साठी निधीचा अभाव; वीजमंंत्र्यांकडून स्पष्टोक्ती

फळदेसाई म्हणाले, मानशीचे खारेपाणी शेत जमिनीत घुसत आहे. जमीन शेती पिकवण्यासाठी आहे, की सुंगटे पोसण्यासाठी. आता बांध फुटल्यामुळे आणि मानशीतून प्रमाणाबाहेर खारेपाणी आत साठवून ठेवल्यामुळे लोकांना दोन पिके घेणे अवघड झाले आहे.

विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी याचा पाहणी करून अहवाल दिला पाहिजे. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे. आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले, की शेतीला प्रोत्साहन देणे ही खात्याची जबाबदारी आहे.

शेतकरी शेती का करू शकत नाहीत, या कारणांची दखल विभागीय कृषी अधिकाऱ्यांनी घ्यावी. तसे आदेश सरकारने त्यांना द्यावेत. शेतकऱ्यांना शेत जमीन पडीक ठेवू नये, अशी खात्याची भूमिका असली पाहिजे.

आमदार वीरेश बोरकर यांनी तिसवाडीतील तीन मोठे बांध फुटल्याने सर्व शेतजमीन पाण्याखाली गेल्याचे नमूद केले. ते म्हणाले, शेती पूर्ववत करण्यासाठी बांध बांधले पाहिजेत. हे काम कधी होणार, ते सरकारने सांगावे. आमदार वेन्झी व्हिएगश यांनी संयुक्त पाहणीची मागणी केली.

michael lobo
Banastarim Bridge Accident : मद्यधुंद अवस्‍थेमुळेच अपघात; चालकाला कोठडी

मंत्री नाईक यांनी सांगितले, की 2 हजार किलोमींटर लांबीचे बांध आहेत. बांधांची दुरुस्ती खाते करत असले, तरी प्रत्यक्षात शेतकरी संघटनांकडे त्यांचा ताबा असतो. तेथे असलेल्या मानशींवर मामलेदार म्हणजे महसूल खात्याचे नियंत्रण असते.

आमच्या खात्याचे काम बांध दुरुस्तीचे आहे. काही ठिकाणी जलसंपदा खाते ते काम करते. त्यामुळे शेत जमीन बुडण्यास केवळ कृषी खात्याला जबाबदार धऱता येणार नाही.

शेतांची पाहणी करा!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले, की जिलेटिनचा वापर स्थानिकच करतात. तेथे परप्रांतीय नाहीत. त्याची माहिती सगळ्यांना असते. त्यांनी ती माहिती पोलिस किंवा मामलेदारांना दिली पाहिजे. शेतजमीन बुडण्याचा विषय गंभीर आहे. विभागीय कृषी अधिकारी अशा शेतांची पाहणी करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com