संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा का नोंद केला नाही? माजी आमदार आलेमाव यांचा सवाल

फा. बोलमॅक्स परेरा यांना अंतरिम जामीन नाकारला
Churchill Alemao
Churchill Alemao Dainik Gomantak
Published on
Updated on

Court Refuses Interim Relief To Fr Bolmax Pereira: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आलेले चिखली येथील चर्चचे फादर बोलमॅक्स परेरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज निकाली लागेपर्यंत त्यांना अंतरिम जामीन देण्यात यावा यासाठी केलेली मागणी दक्षिण गोवा अतिरिक्त सत्र न्यायालयाने आज फेटाळून लावली.

हा अर्ज सुनावणीस आला असता फा. बोलमॅक्स यांच्या अर्जावर आपले म्हणणे मांडण्यासाठी वास्को पोलिसांनी वेळ मागून घेतला. त्यामुळे याबाबत सुनावणी स्थगित करण्यात आली. आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.

Churchill Alemao
Banastarim Bridge Accident : मद्यधुंद अवस्‍थेमुळेच अपघात; चालकाला कोठडी

दरम्‍यान, फा. परेरा यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद होत असेल तर त्याच न्यायाने यापूर्वी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्‍याबद्दल वादग्रस्‍त वक्तव्‍य करणारे तत्‍कालीन संघचालक सुभाष वेलिंगकर यांच्यावर गुन्हा का नोंद केला नाही? असा सवाल माजी आमदार चर्चिल आलेमाव यांनी उपस्‍थित केला आहे.

फा. परेरा यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफीही मागितली आहे. त्यामुळे त्यांना माफ करणे योग्य आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे तसा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे. या मुद्यावरून धार्मिक वातावरण बिघडविण्याचा कोणी प्रयत्न करू नये, असे आवाहनही आलेमाव यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com