Gautam Khattar Arrest Dainik Gomantak
गोवा

Gautam Khattar: गौतम खट्टरला हिमाचल प्रदेशातून अटक, कुलू जिल्ह्यातून घेतले ताब्यात, लवकरच आणणार गोव्यात

Gautam Khattar Arrest: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधान करून धार्मिक भावना दुखावल्यानंतर बेपत्ता असलेला मुख्य संशयित यूट्युबर गौतम खट्टर याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी प्रक्षोभक आणि वादग्रस्त विधान करून धार्मिक भावना दुखावल्यानंतर बेपत्ता असलेला मुख्य संशयित यूट्युबर गौतम खट्टर याला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला हिमाचल प्रदेश पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी कुलू जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. गोवा पोलिस त्याचा ताबा घेऊन लवकरच गोव्यात आणणार आहेत.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. खट्टर याच्या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध करण्यात आला होता. खट्टर याला अटक करण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात आली होती आणि संतप्त नागरिकांनी यापुढेही आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सरकारला दिला होता.

राज्यभर विविध पोलिस स्थानकांमध्ये खट्टर याच्या विरोधात तक्रारीदेखील दाखल करण्यात आल्या होत्या. लोकांच्या या वाढत्या संतापाची दखल घेत गोवा सरकारने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

सुरुवातीला या प्रकरणाचा तपास वास्को पोलिसांकडे होता. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आणि आंतरराज्य धागेदोरे पाहता हा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. गुन्हे शाखेने तातडीने विशेष पथके तयार करून त्याचा शोध सुरू केला. खट्टर परदेशात पळून जाऊ नये, यासाठी ‘लुक आऊट’ नोटीसही जारी करण्यात आली होती.

याच प्रकरणात गुन्हे शाखेने गौतमचा भाऊ माधव खट्टर याला उत्तराखंडमधील हरिद्वार येथून दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. गौतमने केलेले प्रक्षोभक भाषण माधवनेच लिहून दिले होते. तसेच ते भाषण सोशल मीडियावर व्हायरल करण्यातही त्याचा मोठा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी त्याने ५१ हजार रुपये आणि विमान तिकिटांची मागणी केली होती.

१८ एप्रिल रोजी वास्को येथील भगवान परशुराम जयंती उत्सवादरम्यान गौतम खट्टर याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली होती. काँग्रेस नेते पीटर डिसोझा यांनी याविरोधात वास्को पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम २९९ (धार्मिक भावना दुखावणे) आणि कलम १९६ (धार्मिक आधारावर शत्रुत्व वाढविणे) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

गोवा पोलिस होणार हिमाचलला रवाना

सध्या गौतम खट्टर हा हिमाचल पोलिसांच्या ताब्यात असून, गोव्याच्या गुन्हे शाखेचे एक पथक लवकरच त्याचा ताबा घेण्यासाठी रवाना होणार आहे. त्याला गोव्यात आणल्यानंतर या प्रक्षोभक विधानामागचा खरा उद्देश आणि यामध्ये इतर कोणाचा हात आहे का, याचा सविस्तर तपास केला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beach: पेडण्यात पर्यटनाची भरारी!

Pregnant Woman Viral Video: 9 महिन्यांची प्रेग्नन्सी आणि चक्रासन! महिलेचा थक्क करणारा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल

Goa Lake Ecosystem: ज्याला आपण 'विकास' समजलो, तोच ठरला तलावांचा काळ! काँक्रीटच्या भिंतींमुळे गोव्याचे जलस्रोत कसे बनले 'स्मशान'?

Dhruv Yog 2026: अब्जाधीश होण्याचा मार्ग मोकळा? 'ध्रुव योगा'मुळे 4 भाग्यवान राशींवर होणार पैशांचा पाऊस; मिळणार कुबेराचा खजिना

Arambol Fish Market: हरमल मासळी मार्केटच्या छपराचे काम पूर्ण; विक्रेते, ग्राहकांना दिलासा; आमदार आरोलकरांचे अभिनंदन

SCROLL FOR NEXT