Online Gaming And Casino In Goa 
गोवा

लग्नासाठी काढलेले 15 लाखांचे कर्ज कॅसिनोत उधळले, कुडचडेतील नवरदेवाचा विवाह पुढे ढकलला

कुडचडेत ऑनलाईन कॅसिनोला बळी पडलेल्या युवकांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय असल्याचे स्थानिक सांगतात

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यात ऑनलाईन गेमिंग आणि कॅसिनोच्या आहारी गेलेल्या युवकांची वाढती समस्या, यावर एकच दिवसांपूर्वी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चर्चा झाली. सरकारने याबाबत कडक नियमावली करून तरूणांना या व्यसनापासून परावृत्त करण्याची गरज असल्याचे मत यावेळी विरोधकांनी मांडले.

असे असताना कुडचडे येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुगाराला बळी पडलेल्या एका युवकाने लग्नासाठी काढलेले 15 लाखांचे कर्ज पैसे कॅसिनोवर उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे युवकाचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे.

कुडचडेत ऑनलाईन कॅसिनोला बळी पडलेल्या युवकांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय असल्याचे स्थानिक सांगतात. कॅसिनोत झालेली उधारी चुकती करण्यासाठी युवक टोकाची पावले उचलत आहेत. आता लग्नासाठी घेतलेले तब्बल 15 लाखांचे कर्ज कॅसिनोवर उधळल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

यापूर्वी जुगाराला बळी पडलेल्या युवकांनी दुचाकी विकल्याच्या घटना देखील उघडकीस आल्या आहेत. त्यात या नव्या प्रकरणामुळे राज्यातील युवक ऑनलाईन जुगाराच्या जाळ्यात अडकत चालल्याचे दिसत आहे. याबाबत स्थानिक तसेच, लोकप्रतिनिधी देखील चिंता व्यक्त करत आहेत.

विधानसभेत झाली वादळी चर्चा

सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात ऑनलाईन जुगाराबाबत वादळी चर्चा झाली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी, राज्यात ऑनलाईन जुगार खेळला जात असून, त्यात अनेक युवक गुंतले आहेत. लाखो रुपये गमावून बसल्यानंतर काहीजण आत्महत्या करत आहेत. अशी चिंता व्यक्त केली.

यावर उत्तर देताना गृहमंत्री या नात्याने सावंत यांनी राज्यात वैध पद्धतीने सुरू असणारे कॅसिनो  आहेत. पण, त्याशिवाय ऑनलाईन गेम खेळले जात आहेत, त्याबाबत आम्ही माहिती घेत असून गोव्यात ऑनलाईन गेमिंग चालू देणार नाही, अशी भूमिका मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

Ranji Trophy Cricket: घरच्या मैदानावर गोव्याची रणजी मोहीम सुरू; अनुभवी बडोद्याशी पहिल्यांदाच रणजी लढत

SCROLL FOR NEXT