Laxman Kambli Dainik Gomantak
गोवा

गरजू व्यक्तींना मदत करणे आपले कर्तव्य: प्रवीण आर्लेकर

असे उद्गार मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी कोरगाव येथील लक्ष्मण कांबळी या नागरीकाला व्हिलचेर मोफत दिल्यानंतर ते बोलत होते.

दैनिक गोमन्तक

मोरजी: प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) कधी कुणाला खोटी आश्वासने देत नाहीत, तर कृतीतून आपले कार्य करतो, गरजवंताना मदत करणे आपले परम कर्तव्य आहे. ज्याना गरज असते त्यांनी हाक मारली तर आपण त्याला प्रतिसाद देतो, गरज्वन्ताना मदत करणे हि ईश्वरसेवा आपण मानतो असे उद्गार मगोचे नेते प्रवीण आर्लेकर (Praveen Arlekar) यांनी कोरगाव येथील लक्ष्मण कांबळी या नागरीकाला व्हिलचेर मोफत दिल्यानंतर ते बोलत होते.

कोरगाव येथील लक्ष्मण कांबळी (Laxman Kambli) या नागरिकाचा एक पाय काढावा लागला होता. त्याला व्हिलचेरची गरज होती. या विषयी मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या कानी हि गोष्ठ घातली. मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी विलंब न लावता नागरिकासाठी लगेच आरोग्य विषयक साहित्य प्रधान केले. या कार्क्रमाला सौ. पल्लवी आर्लेकर, मगोचे जेष्ठ कार्यकर्त्ये सुदीप कोरगावकर, प्रवक्ते उमेश तळवणेकर, नरेश कोरगावकर, सिथिया गावकर, जयेश पालयेकर आदी उपस्थित होते.

आमदाराला जाणीव नाही: प्रवीण आर्लेकर

प्रवीण आर्लेकर यांनी बोलताना लक्ष्मण कांबळी यांच्या पाय काढून खूप वर्षे झाली.मात्र या मतदार संघातून निवडून आलेल्या आमदाराला कसलीच जाणीव नाही, आपल्या मतदाराना काय हवे काय नको यांची विचारपूस ते केवळ निवडणुकीवेळी करत असतात असा आरोप केला. आपले काम केवळ गरजवंताना मदत करणे एवढेच आहे. ज्याला मदत झाली त्याचे आशीर्वाद आम्हाला महत्वाचे आहे.

समाजाच्या नागरिकांनी पेडण्यात आणले.

आपणास सुरुवातीला पेडणे मतदार संघात आपल्या समाजातील नागरिकांनी आणले. व आपल्याला जनसेवा करण्याची संधी दिली. मी कधी कुणाला खोटे आश्वासन देणार नाही तर कृतीतून कार्य करून दाखवणार असल्याचे सांगितले.

पेडणेकराना कधीच फसवणार नाही

पेडणेची जनता स्वाभिमानी जनता त्यांनी जर एकाध्यावेळी कुणाला शब्द दिला तर तो ती कायम स्वरूपी पाळणारी आहे. त्यामुळे आपण आता आणि पुढेही भविष्यात पेडणेकराना फसवणार नाही. अशी ग्वाही दिली.

जनतेला वीज नसेल तर मलाही नसेल

मतदार संघात वीज पाणी बेरोजगारी हि प्रमुख समस्या आहे. माझ्या घरात वीज पाणी नसेल तर जनतेच्याही घरी वीज पाणी नसणार त्यामुळे मला समस्यांची जाणीव होणार त्यासाठी मी २४ तास आमदार होण्यापूर्वीच मतदार संघात वास्तव्य करत आहे. असे मगोचे नेते प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.

पेडणेत कायम स्वरूपी वास्तव्य

या पूर्वी पेडणे मतदार संघातून निवडून आलेले तालुक्या बाहेरच्या आमदारांनी आपण आमदार झाल्यानंतर मतदार संघात वास्तव्य करणार असे आश्वासन दिले मात्र त्यांनी कधी वास्तव्य केले नाही. मात्र प्रवीण आर्लेकर यांनी आमदार होण्यापूर्वीच धारगळ येथे घर स्वताचे उभारून ते वास्तव्य ३० रोजी पासून करणार आहे, यावेळी आर्लेकर याना पत्रकाराने छेडले असता, मतदार संघातील समस्या जाणीव आणि त्याचा अनुभव घेण्यासाठी वीज पाणी गायब कशी होते, याचा जवळून अनुभव घेता येईल मतदाराना २४ तास देण्यासाठी आपण मतदार संघात कायम स्वरूपी वास्तव्य करत आहे. असे आर्लेकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

मंडगावला राहून कळणार नाही

मतदार संघात कोणत्या समस्या आहे यांची जाणीव मडगाव येथे राहून कळणार नाही, असा टोला कुणाचेही नाव न घेता प्रवीण आर्लेकर यांनी मारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT