Goa: 'व्हीएम' यांना क्रीडा संचालकपदी बढती

बढतीपूर्वी प्रभुदेसाई क्रीडा व युवा व्यवहार खात्यात उपसंचालकपदी (शारीरिक शिक्षण व युवा सेवा) कार्यरत होते.
वसंत मोहन (व्ही. एम.) प्रभुदेसाई यांना क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी बढती  देण्यात आली आहे.
वसंत मोहन (व्ही. एम.) प्रभुदेसाई यांना क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी बढती देण्यात आली आहे.Dainik Gomantak

पणजी: वसंत मोहन (व्ही. एम.) प्रभुदेसाई Vasant Mohan (V. M.) Prabhudesai यांना क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या (Department of Sports and Youth Affairs) संचालकपदी बढती (Promotion as Director) देण्यात आली आहे. गोवा लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार खात्यांर्गत बढती समितीने प्रभुदेसाई यांची शिफारस केल्यानंतर गोवा सरकारच्या अवर सचिव (कार्मिक 2) माया पेडणेकर यांनी यासंबंधी सोमवारी आदेश जारी केला. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्याचे नमूद करण्यात आले आहे.

वसंत मोहन (व्ही. एम.) प्रभुदेसाई यांना क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी बढती  देण्यात आली आहे.
Goa: चाटर्ड विमान सेवा सुरू करा

बढतीपूर्वी प्रभुदेसाई क्रीडा व युवा व्यवहार खात्यात उपसंचालकपदी (शारीरिक शिक्षण व युवा सेवा) कार्यरत होते. सध्या त्यांच्याकडे गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालकपदाचा ताबा आहे.

प्रभुदेसाई यांनी यापूर्वी क्रीडा व युवा व्यवहार खात्याचे एपीईओ (सहाय्यक शारीरिक शिक्षण अधिकारी), फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमचे व्यवस्थापक, तसेच क्रीडा खात्यात उपसंचालक आदी पदावर काम केले आहे. सुमारे दोन दशकांपूर्वी त्यांनी क्रीडा संचालक व गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक या दोन्ही जबाबदाऱ्या एकत्रितपणे पेलल्या होत्या.

वसंत मोहन (व्ही. एम.) प्रभुदेसाई यांना क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी बढती  देण्यात आली आहे.
Goa: फुकट पाणी देण्याऐवजी नोकऱ्या द्या - एल्विस गोम्स

प्राप्त माहितीनुसार, प्रभुदेसाई यांच्याकडे क्रीडा व युवा व्यवहार संचालकपदाबरोबरच गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालकपदही राहण्याचे संकेत आहेत. गोव्यातील नियोजित 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची तयारी नजरेसमोर ठेवून राज्य सरकार दोन्ही पदे प्रभुदेसाई यांच्या देऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com