Goa Govt
Goa Govt

खाण संचालकपदी आयएएस अधिकारी

पणजी

राज्य सरकारने खाण संचालकपदी आता भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी विवेक एच. पी. यांची नियुक्ती आज केली. गोवा माहिती तंत्रज्ञान महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा अतिरिक्त ताबाही त्यांच्याकडेच राहणार आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी तारीक थॉमस यांच्याकडे विशेष सचिव (गृह, दक्षता, कार्मिक) हा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या सेवेत रुजू झालेल्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी संजय गिहार यांच्याकडे जलसंपदा, प्रोव्होदोरीया, ग्रामीण विकास, पंचायत, गृहनिर्माण आणि राजभाषा या खात्यांच्या सचिवपदांचा ताबा देण्यात आला आहे. कुलदीपसिंह गांगर यांच्याकडे कृषी, पशुवैद्यकीय पशु संवर्धन, सार्वजनिक गाऱ्हाणी खात्यांचे सचिवपद आणि बालहक्क आयोगाचे सदस्य सचिवपद सरकारने आदेशान्वये दिले आहे. राज्य सरकारने आज वरिष्ठ व कनिष्ठ श्रेणी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. काही अधिकाऱ्यांना बढत्याही दिल्या. वरिष्ठ श्रेणीतील बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे -
अरविंद बुगडे (मुरगाव पालिका मुख्याधिकारी), प्रवीण बरड (सदस्य सचिव कला अकादमी), दामोदर मोरजकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, गोवा खादी ग्रामोद्योग मंडळ).
बढती मिळून बदली झालेले वरिष्ठ श्रेणीतील अधिकारी - उमाकांत कोरकणकर (अतिरीक्त आयुक्त वाणिज्य कर) फ्रांन्सक्विन्हा ऑलिव्हेरा (संचालक प्रशासन, कला अकादमी), परेश फळदेसाई (संयुक्त सचिव महसूल), सुधीर केरकर (संचालक, हस्तकला वस्त्रोद्योग व काथ्याकाम), शंकर गावकर (संचालक प्रशासन क्रीडा प्राधिकरण), त्रिवेणी वेळीप (व्यवस्थापकीय संचालक गोवा राज्य अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ), संगीता परब (संयुक्त संचालक, एकात्मिक महिला बालकल्याण) अशोक राणे (संयुक्त सचिव राजशिष्टाचार), पिपी मुरगावकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, उत्तर गोवा जिल्हा पंचायत), प्रसन्न आचार्य (सदस्य सचिव, रवींद्र भवन मडगाव), विजय परांजपे (अतिरिक्त सचिव प्रशासकीय सुधारणा), बिजू नाईक (संचालक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खाते), रुही रेडकर (सदस्य सचिव, संजय स्कूल), गौरीश शंखवाळकर (संयुक्त सचिव राज्यपाल), विनायक वळवईकर (मुख्य कार्यकारी अधिकारी, गोवा मानसिक आरोग्य, स्थलांतरितांची मालमत्ता कस्टोडियन अतिरिक्त ताबा), वासुदेव शेटये (संचालक प्रोव्हेदोरीया), ॲंथनी डिसोझा (संचालक, अनिवासी गोमंतकीय आयुक्तालय).
बढती मिळून बदली झालेले कनिष्ठ श्रेणीतील अधिकारी - दीपक वायंगणकर (डिचोलीचे उपविभागीय अधिकारी, साखळीच्या रवींद्र भवन सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त ताबा), फातिमा डिसोझा (अवर सचिव वित्त, लेखापरीक्षण), पांडुरंग तळगावकर (प्रशासन उपसंचालक पशुवैद्यकीय आणि प्रशासन उपसंचालक कृषीचा अतिरिक्त ताबा), बाळा कोरगावकर (सहायक संचालक प्रशिक्षण हस्तकला संचालनालय, अवर सचिव गोवा राज्य माहिती आयोग अतिरिक्त ताबा), दिनेश पवार (उपसंचालक, प्रशासन, वाहतूक खाते, उपसंचालक प्रशासन, पंचायत खाते अतिरिक्त ताबा), ईशा सावंत (अवर सचिव दोन, महसूल खाते) सतीश प्रभू (उपविभागीय अधिकारी काणकोण, काणकोण पालिका मुख्याधिकारी अतिरिक्त ताबा), अबीर हेदे ( उपसंचालक खाण), रमेश गावकर (सहकार उपनिबंधक, प्रशासन, उपसंचालक प्रशासन एसडीसीटी), राजेश आजगावकर (उपसंचालक प्रशासन पोलिस महासंचालक कार्यालय, उपसंचालक प्रशासन, नगरनियोजन अतिरिक्त ताबा), सीमा साळकर ऊर्फ वीरा नायक (प्रकल्प अधिकारी ग्रामीण विकास यंत्रणा, उत्तर), मधु नार्वेकर (केपे पालिका मुख्याधिकारी), रवी शेखर निपाणीकर (पेडणे उपविभागीय अधिकारी, तिळारी भूसंपादन अधिकारी अतिरिक्त ताबा), जुआंव फर्नांडिस (सासष्टी उपविभागीय अधिकारी).
बढती न होता केवळ बदली झालेले अधिकारी - रोशेल फर्नांडिस (उपजिल्हाधिकारी, दक्षिण गोवा, घोगळ येथील भू संपादन अधिकारी), सचिन देसाई (मुरगाव उपविभागीय अधिकारी, बायणा रवींद्र भवन सदस्य सचिव अतिरिक्त ताबा), प्रितीदास गावकर (सहायक आयुक्त वाणिज्य कर) क्लेन मादैरा (उपसंचालक उच्च शिक्षण), चंद्रकांत शेटकर (भूसंपादन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, राष्ट्रीय महामार्ग विशेष भू संपादन अधिकारी अतिरिक्त ताबा), उल्हास कदम (उत्तर गोवा कोमुनिदाद प्रशासक), कबीर शिरगावकर (मुख्याधिकारी म्हापसा पालिका), गुरुदास देसाई (तिसवाडी उपविभागीय अधिकारी), नीलेश धायगोडकर (उपसंचालक प्रशासन अन्न व औषध प्रशासन), अमिर परब (अवर सचिव गृह, अवर सचिव नगरविकासमंत्री अतिरिक्त ताबा), राजू देसाई (अवर सचिव प्रशासकीय सुधारणा खाते, अवर सचिव कायदा आस्थापने अतिरिक्त ताबा), कुलदीप आरोलकर (उपसंचालक पंचायत दक्षिण). या आदेशानुसार, उपजिल्हाधिकारी स्नेहल प्रभू यांच्याकडे दक्षिण गोवा प्रकल्पाधिकारी ग्रामीण विकास यंत्रणा दक्षिण हा ताबा देण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com