Yellow Alert In Goa Dainik Gomantak
गोवा

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Goa Weather Update : गेल्या काही दिवसांपासून गोव्यात कडाक्याचे ऊन आणि वाढता उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

Sameer Amunekar

IMD Issues Yellow Alert for Goa

पणजी: गेल्या काही दिवसांपासून गोव्यात कडाक्याचे ऊन आणि वाढता उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र, आता निसर्ग गोवेकरांना काहीसा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) गोव्यासाठी 'यलो अलर्ट' जारी केला असून, ३१ मार्च आणि १ एप्रिल रोजी राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पावसामुळे तापमानात घट होऊन वातावरणात गारवा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

यलो अलर्ट आणि हवामानातील बदल

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आणि स्थानिक हवामानातील बदलांमुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. ३१ मार्च आणि १ एप्रिल या दोन दिवसांत राज्याच्या विविध भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. सध्या कडक उन्हाळा अनुभवायला मिळत असताना अचानक होणाऱ्या या बदलामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून तात्पुरती सुटका मिळेल.

बागायतदारांच्या चिंतेत भर

एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना पावसाची प्रतीक्षा असली, तरी गोव्यातील प्रमुख पीक असलेल्या काजू आणि आंबा बागायतदारांसाठी ही बातमी चिंतेची ठरू शकते. सध्या काजू. आंबाचे पीक काढणीच्या हंगामात आहे.ऊन आणि पावसाच्या या खेळामुळे शेतीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने बागायतदार धास्तावले आहेत.

नागरिकांना खबरदारीचे आवाहन

हवामान विभागाने 'यलो अलर्ट' जारी केल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. विशेषतः विजा चमकत असताना झाडाखाली किंवा उघड्या जागेवर थांबू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या उष्णतेनंतर अचानक पाऊस आल्यास आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT