Goa Theft: फोंड्यात ज्वेलरी शॉपमधून 1.14 कोटींचे सोने लंपास; कर्मचाऱ्यांवरच संशयाची सुई

Ponda jewelery theft : गोव्यातील फोंडा शहरात एका नामांकित सराफी शॉपमध्ये मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Jewelry Shop Robbery Goa
Ponda jewelry theftDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोव्यातील फोंडा शहरात एका नामांकित सराफी शॉपमध्ये मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुकानातील तब्बल १ कोटी १४ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले असून, याप्रकरणामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ही चोरी बाहेरील व्यक्तीने केली नसून दुकानाशी संबंधित असलेल्या दोन संशयित व्यक्तींनीच केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

दागिन्यांची चोरी

मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्चपूर्वी ही चोरी झाल्याचे समोर आले आहे. दुकानातील साठ्याची तपासणी केली असता, सुमारे ६९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने गायब असल्याचे मालकाच्या निदर्शनास आले. ज्या दागिन्यांची चोरी झाली आहे, त्यांची बाजारभावाप्रमाणे किंमत १ कोटी १४ लाख रुपये इतकी आहे. चोरीच्या या घटनेनंतर ज्वेलरी शॉपच्या मालकाने तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

Jewelry Shop Robbery Goa
Goa Opinion: निवडणुकीच्या काळात लोकांना मोठमोठी 'आश्वासने' दिली जातात, नंतर त्या आश्वासनांची 'पूर्तता' कितपत होते?

कर्मचाऱ्यांवरच संशय

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, चोरीची पद्धत पाहता यामध्ये दुकानातील किंवा दुकानाशी संबंधित असलेल्या दोन व्यक्तींचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि दुकानातील व्यवहारांची पडताळणी केल्यानंतर पोलिसांना काही संशयास्पद धागेदोरे मिळाले आहेत.

Jewelry Shop Robbery Goa
Goa Crime: किळसवाणा प्रकार! पोटच्या मुलीवर केला लैंगिक अत्याचार; गोवा खंडपीठाचा नराधम बापाला दणका, उलटतपासणीचा अर्ज फेटाळला

पोलीस तपास

फोंडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. ठसेतज्ज्ञ आणि फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळी भेट देऊन नमुने गोळा केले आहेत. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, मात्र संशयितांची चौकशी सुरू असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com