पेडणे : मोपा विमानतळ प्रकल्पासाठी काम करणाऱ्या एका कंत्राटदाराच्या कामगारांनी व्यवस्थित जेवण मिळत नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांचा अद्याप पगार मिळाला नसल्याच्या रागातून आक्रमक पवित्रा घेऊन इमारतीवर आणि वाहनांवर दगडफेक केली. तसेच काही सुरक्षा रक्षकांना मारहाण केली. हा सगळा प्रकार शमेचे आडवण येथे विमानतळाच्या समोरील भागात झाला.
मोपा विमानतळाचे (Mopa Airport) बांधकाम करणाऱ्या मुख्य कंत्राटदाराच्या अंतर्गत असलेल्या कंत्राटदाराने काम सुरु ठेवले असून पाचशेच्यावर कामगार आणि कर्मचारी असून ते बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आदी राज्यातील सुमारे पाचशेपेक्षा जास्त मजूर आणि कामगार आहेत. गेले सहा महिने पगार न मिळाल्याने, तसेच वेळेवर व्यवस्थित जेवण न मिळाल्याने कामगारांमध्ये असंतोष धुमसत होता. त्यानुसार काम करायचे नाही. कंत्राटदार कंपनीचे आदेश पाळायाचे नाहीत, असे ठरले होते, असे असताना यातील काही कामगार कामावर गेल्यामुळे इतर बहुतांश कामगार (Worker) खवळले. कामावर गेलेल्या कामगारांना त्यांनी मारहण करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षारक्षक पुढे सरसावल्यावर कामगार आणि सुरक्षा रक्षकांत एकमेकांना मारहाणीचे प्रयत्न झाले. त्यात काही सुरक्षा रक्षक जखमी झाले. त्यानंतर या कामगारांनी विमानतळावरील इमारती व गाड्यावर दगडफेक केली. यात काही वाहनांच्या काचा फुटल्या.
घटनेची माहिती मिळाल्यावर पेडणे पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गेटच्या आत कुणालाही प्रवेश देण्यात येत नव्हता. या प्रकरणाची बाहेर वाच्यता होऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली असून प्रकरण मिटविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान दुपारी सदर कंत्राटदार कंपनीने या कामगारांची भेट घेऊन 17 मार्च रोजी पगार देण्याचे मान्य केले आहे. त्यानंतर काल दुपारी यातील काही कामगार कामावर जाऊन कामाला सुरवात केल्याचीही माहिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.