राजवेल तोर्सेतील तिळारी कालव्याला गळती

घरांना धोका: जलसिंचन खात्याचा अनागोंदी कारभार
 Tilari Canal
Tilari CanalDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: तिळारी कालव्याचा पाट तोर्से गावातील एकता नगर येथून गावात प्रवेश करतो तो फकीरपाटा येथे तोर्से गावातून बाहेर पडतो. राजवेल,पातोभाटले या भागातून जाणाऱ्या तिळारी कालव्याला गळती लागून पावसाळ्यात जसे झरे फुटतात, त्याही पेक्षा मोठे झरे या भागातील मुरूमाड जमिनीतून वाहु लागले आहेत.विहीरी भर उन्हाळ्यात तुडूंब वाहू लागल्या आहेत. पातोभाटले येथे असणाऱ्या घरात आणि घरांच्या भिंतीना ओल आलेली आहे.गटारेही ओसंडून वाहू लागले आहेत.

 Tilari Canal
गोव्यात नाकारल्या गेल्या तब्बल 2,500 पोस्टल मतपत्रिका

सर्वे नंबर 193/27,1,सर्वे नंबर 188/0 मधून जाताना सर्वे नंबर 193/1 आणि सर्वे नंबर 188/0 या भागात असलेली 800 मीटर लांब आणि 600 मीटर रुंद असलेला तिळारी नाला तयार केला.यासाठी हजारो ट्रक माती बाहेरून आणली शिवाय लगतची जमीन पोखरून पिरॅमिड सदृष्य डोंगरही तयार केला. सर्वे 193/1 आणि सर्वे नंबर 188/0 नंबर या डोंगराच्या पलीकडून उंच भागातून कडशी नदी वाहते.

डोंगराळ भागातील मुरूम मातीचा परीसर असल्याने नैसर्गिकरीत्या कडशी नदीचे पाणी तोरसे गावातील सखल भागात येते. मुरूमाड मातीतून झिरपुन तोरसे गावातील आमटव्हाळ,फोंडान,सावरीचे भोम, माऊली मंदीर, घाडीगावठाण, ग्रामपंचायत ते हायस्कूल, तांबोसे पर्यंतच्या सखल भागात कडशीचे पाणी झिरपते. या भागातील जमिनी या वायंगणी शेतीसाठी पूर्वीपासून प्रसिध्द आहेत. कारण मातीचा भराव टाकल्यानंतर शास्त्रोक्त पध्दतीने पाणी शिंपुन टाकलेली माती बुलडोझरने बसवलेली नव्हती.

पेडणे तालुका विकास समितीचे अध्यक्ष व्यंकटेश नाईक यांनी तिराळी जलसिंचन खात्याचे कनिष्ठ अभियंता फैझल शेख यांच्याशी शुक्रवार दि.11 मार्च रोजी संपर्क साधून ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि पाहणी केली. त्वरीत कालव्याचे पाणी बंद करू तिराळी जलसिंचन खात्याने तात्पुरती प्लास्टीक ताडपत्री घालून आपल्या परीने शेतकऱ्यांच्या डोळ्याना पाने पुसण्याचा प्रयत्न केला. पण एका दिवसातच काम तकलादू आहे, याची प्रचिती आली.

शेतकऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष

हा भाग अतिसंवेदनशील असल्याने तिळारी जलसिंचन खाते ज्या वेळी ़‘फोंडानाक’ या राजवेल, पातो भाटले भागातील दरीत पिरॅमिडच्या आकाराचा डोंगर तयार करत होते. तेव्हा शेतकऱ्यांनी अभियंत्यांना सांगितले होते, भविष्यात या कृत्रिम डोंगराखाली असलेल्या घरांच्या सुरक्षिततेला धोका उत्पन्न होईल. कालव्याला गळती झाल्यास भुस्खलन होऊन सखल भागातील घरांची हानी आणि मालमत्तेचे नुकसान होऊ शकते.पण अधिकाऱ्यांनी त्या सूचनांकडे दुर्लक्ष केले.

 Tilari Canal
माजी मंत्री फ्रान्सिस्को माँत क्रुझ झाले भावूक

हा एक किलोमीटर चा भराव टाकून तयार केलेला कालवा हा निव्वळ भ्रष्टाचार आहे.कंत्राटदाराने निकृष्ट पध्दतीने भराव टाकून पिरॅमिडच्या आकाराचा अंदाजे 800 मीटर लांब व अंदाजे 500 मीटर रुंद आणि अंदाजे 50 मीटर उंचीचा कृत्रिम डोंगर तयार करून दरी बुजविताना तंत्रज्ञानावर आधारीत बांधकाम न करता निकृष्ट बांधकाम केले. त्याला कंत्राटदाराएवढेच या कामावर देखरेख करणारे सरकारी अधिकारी सुध्दा जबाबदार आहेत.

-व्यंकटेश नाईक.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com