Women's Day 2025 Dainik Gomantak
गोवा

Women's Day 2025: गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी पोर्तुगीजांशी संघर्ष करणारी 'रणरागिणी', सुधाताई जोशी यांची प्रेरणादायी कथा

Sudhatai Joshi story: गोवा मुक्तिसंग्रामात अनेक वीरांगनांनी आपल्या धैर्याने आणि त्यागाने योगदान दिले आहे.

Sameer Amunekar

गोवा मुक्तिसंग्रामात अनेक वीरांगनांनी आपल्या धैर्याने आणि त्यागाने योगदान दिले आहे. त्यापैकी एक महत्त्वपूर्ण नाव म्हणजे 'स्वातंत्र्य सौदामिनी' सुधाताई जोशी. त्यांचा जीवनप्रवास आणि कार्य गोवा मुक्तिसंग्रामाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.

सुधाताई जोशी यांचा जन्म 14 जानेवारी 1918 रोजी गोव्यातील प्रियोल गावात झाला. त्यांना औपचारिक शिक्षण मिळाले नसले तरी, त्यांनी आपल्या वडिलांच्या सहाय्याने आणि स्वतःच्या प्रयत्नांनी पर्याप्त ज्ञान मिळवले. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह थोर विद्वान आणि 'संस्कृती कोश'चे संपादक पंडित महादेवशास्त्री जोशी यांच्याशी झाला.

विवाहानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या, जिथे महादेवशास्त्री जोशी यांच्या संस्कृतिकोषाचे काम सुरू होते. तशातच गोव्याच्या मुक्तीसाठी काहीतरी करावे असे त्यांच्या मनात होते. पीटर अल्वारिस यांच्या सोबत बैठकीत गोव्यात सत्याग्रह करायचा असे ठरले.

गोवा मुक्तिसंग्रामात सहभाग

महादेवशास्त्री जोशी गोवा मुक्तिसंग्रामाशी संबंधित होते आणि त्यांनी सत्याग्रह आंदोलनात सहभागी होण्याचे ठरवले. परंतु त्यांच्या तब्येतीचे कारण देऊन सुधाताईंनी स्वतःच सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी 6 एप्रिल 1955 रोजी म्हापसा येथे सत्याग्रहाचे नेतृत्व केले, जिथे पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यांच्या या धैर्याने त्या काळातील हिंदू स्त्रियांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले.

या सत्याग्रहात सुधाताईंसोबत काणकोण तालुक्यातील दोन 19 वर्षांच्या मुली, कुमुदिनी पैंगीणकर आणि शालिनी लोलियेंकर, त्याचप्रमाणे अंबिकाबाई दांडेकर या 70 वर्षांच्या महिला अशा तीन इतर स्त्रिया सुधाताईंसमवेत होत्या.

जयवंत बुर्ये, प्रभाकर धोंड, दीनानाथ येंडे, रामा फडते, वासुदेव प्रभुदेसाई, श्रीपाद सप्ते, नरसिंह येंडे, बाजीराव बेलवलकर आदी एकूण 13 सत्याग्रहींचा या सत्याग्रहात समावेश होता.

तुरुंगवास

सुधाताईंना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तुरुंगातील कठीण परिस्थितीतही त्यांनी धैर्याने सामना केला. त्यांच्या या त्यागामुळे आणि धैर्यामुळे त्यांची सर्वत्र प्रशंसा झाली.

सुधाताई जोशी यांचे गोवा मुक्तिसंग्रामातील योगदान अमूल्य आहे. त्यांचा त्याग आणि धैर्य आजही आपल्याला प्रेरणा देतो. गोवा मुक्तीच्या साठाव्या वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणे आणि त्यांच्या योगदानाला आदरांजली अर्पण करणे आपले कर्तव्य आहे.

अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार

ज्या काळात भारतीय महिलांची भूमिका प्रामुख्याने घराच्या चौकटीपुरती मर्यादित होती, त्या काळात सुधाताई जोशी यांनी अपार धैर्य आणि निश्चय दाखवला. 6 एप्रिल 1955 रोजी म्हापशा येथे सत्याग्रहाचे नेतृत्व करताना, त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्याचा ठाम निर्धार केला.

त्या काळी पोर्तुगीज सत्तेच्या जाचक कायद्यांमुळे गोमंतकीयांना अनेक बंधनांचा सामना करावा लागत होता. भारतीय स्वातंत्र्यानंतरही गोवा पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली राहिले, त्यामुळे येथील स्वातंत्र्यसैनिकांनी विविध मार्गांनी लढा उभारला. या चळवळीमध्ये सुधाताई जोशी यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे होते.

स्त्रीशक्तीचं उत्तम उदाहरण

सुधाताईंनी आपल्या कार्याने सिद्ध केले की स्त्रिया केवळ घर सांभाळणाऱ्या नव्हेत, तर समाजाच्या परिवर्तनातही मोठी भूमिका बजावू शकतात. त्यांच्या कार्यामुळेच अनेक महिला सत्याग्रहात सहभागी झाल्या आणि गोमंतकीय स्वातंत्र्यलढ्याला बळ मिळाले.

एका सामान्य गृहिणीने आपल्या कुटुंबाला आणि संसाराला काही काळ मागे ठेवून सत्याग्रहात सक्रिय भाग घेतला, हे निश्चितच स्त्रीशक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT