Sameer Amunekar
भारतीय इतिहासात अनेक शूरवीर स्त्रिया झाल्या, ज्यांनी आपल्या धैर्याने, युद्धकौशल्याने आणि बुद्धीमत्तेने परकीय शासकांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला. महिला दिनानिमित्त, अशाच ५ महान हिंदू राण्यांबद्दल जाणून घेऊया.
राणी दुर्गावती राणी दुर्गावती ही गोंडवानाची राणी होती. पतीच्या मृत्यूनंतर राणी दुर्गावतीने मुलाला मार्गदर्शन करून राज्य केले. राणी दुर्गावतीनं अनेक लढाया लढल्या.
राणी ताराबाई या मराठा साम्राज्याच्या इतिहासातील अत्यंत शूर आणि कुशाग्र बुद्धीच्या योद्ध्या होत्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या.
राजकुमारी रत्नावती जैसलमेरचा राजा महारावल रतन सिंहची मुलगी होती. रतनसिंग यांनी जैसलमेर किल्ल्याची सुरक्षा आपल्या मुलीकडे सोपवली. याच काळात बादशहा अलाउद्दीन खिलजीच्या सैन्याने किल्ल्याला वेढा घातला. यावेळी तिने युद्धात आपले सैनिकांना मार्गदर्शन केले.
राणी लक्ष्मीबाई या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाच्या योद्ध्या होत्या. त्या झाशीच्या महाराज गंगाधरराव यांच्या पत्नी होत्या. त्यांच्या पतीच्या निधनानंतर, इंग्रज सरकारने "हडप निती" अंतर्गत झाशीच्या वारसत्वाला नकार दिला, ज्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्ष पुकारला.
राणी चेन्नम्मा या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील पहिल्या महिला क्रांतिकारकांपैकी एक होत्या. १८२४ मध्ये, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्यापूर्वीच, त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता. त्या कर्नाटकातील कित्तूर राज्याच्या राणी होत्या.