Womens Congress President Bina Naik  Dainik Gomantak
गोवा

Bina Naik : महिलांवरील 'लैंगिक छळ' रोखण्यासाठी प्रतिबंधक समितीची स्थापना करा ; बिना नाईक

महिला काँग्रेस : सर्व सरकारी आस्थापनांसह नगरपालिका कार्यालयांना आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

Mapusa : महिलांवरील वाढते लैंगिक अत्याचाराची दखल घेत गोवा काँग्रेस महिला समितीच्या अध्यक्षा बिना नाईक यांनी सर्व सरकारी आस्थापने तथा पालिका कार्यालयस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक समितीची सक्रियपणे स्थापना करावी, अशी मागणी केली. गुरुवारी सायंकाळी म्हापशात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

बिना नाईक म्हणाल्या की, उत्तर गोव्यातील एका पालिकेत महिला कर्मचाऱ्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची कथित बातमी व्हायरल झाली आहे. या बातमीत तथ्य आहे की नाही, हे माहिती नाही. अशावेळी सरकारने याप्रकरणाची सखोल चौकशी करुन पोलिस तपास करावा, अशी मागणी त्यांनी केली.

मुळात पालिका कार्यालयात अशाप्रकारे जर महिलांवर कथित लैंगिक अत्याचार होत असल्यास ही चिंतेची व गंभीर बाब आहे. यात सत्यता असल्यास संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची गरज असल्याचे बिना नाईक म्हणाल्या. हल्लीच, काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता पोलिस बळाचा वापर करुन काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले.

अशावेळी पोलिस बळाचा सरकारकडून गैरवापर होतो. परंतु, महिलांवर होणारे कथित लैंगिक अत्याचार या भाजपा सरकार दृष्टीस पडत नाहीत का0 असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावेळी प्रतीक्षा खलप, सई वळवईकर, पेलाजिया रापोझ, लविना डेकोस्टा, पार्वती नागवेकर या उपस्थित होत्या.

आम्ही ‘त्या’ महिलेच्या पाठीशी

उत्तरेतील एका पालिका कार्यालयातील महिलेवर कथित लैंगिक अत्याचार झाला असल्यास दोषींवर सक्त कारवाई होणे गरजेचे आहे. आणि याप्रकरणी पोलिस तक्रार झाल्यास काँग्रेस महिला वर्ग या पीडितेच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणार व तिला न्याय मिळवून देऊ, असे बिना नाईक व प्रतीक्षा खलप यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: छोटीशी मेहनतच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार खास; जाणून घ्या तुमचे भविष्य

Chimbel: '13 घरे नकाशातून केली गायब'! चिंबलवासीयांचा आरोप; 4.5 लाख चौमी जमीन हडप करण्‍याचा डाव असल्याचा दावा

Goa Assmbly Live: कदंब आणि कारमधील अपघातामुळे प्रवाशांना विलंब

Goa Politics: खरी कुजबुज; युरी, विजय गप्‍प बसणार?

Ukraine Attack: युक्रेनचा रशियाच्या तेल गोदामावर हल्ला! स्फोटानंतर भडकली आग; रशियाने डागली 7 क्षेपणास्त्रे, 76 ड्रोन

SCROLL FOR NEXT