Mapusa Elephant Garden: बच्चेकंपनीमुळे परिसर गजबजला ; रात्री 8 वाजेपर्यंत गर्दी

मज्जाच मजा : म्‍हापशातील ‘हत्ती गार्डन’मध्‍ये रात्री 8 वाजेपर्यंत गर्दी
Elephant Garden
Elephant GardenDainik Gomantak
Published on
Updated on

Mapusa Elephant Garden: शाळांना उन्‍हाळी सुट्टी पडल्‍याने मुलांवरील अभ्यासाचे टेन्शन नाहीसे झाले आहे. मौजमजा करण्यासाठी सध्या लहान मुले कुटुंबीयांसोबत उद्यानात गर्दी करीत आहेत.

म्‍हापशातील उद्याने गजबजू लागलीत. सायंकाळी बाहेर पडलेली बच्चे कंपनी रात्री उशिरापर्यंत उद्यानात रमताना दिसत आहेत. दरम्यान, काही उद्यानांकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

म्‍हापसा शहरातील उद्यानांबाबत बोलताना नगराध्यक्षा प्रिया मिशाळ म्हणाल्या की, उद्यानांबाबत विचारविनिमय सुरू आहे.

गरज पडल्यास सीएसआरअंतर्गत काही उद्याने देखरेखीसाठी देता येतील. इतर उद्यानांची देखभाल पालिकेकडून केली जातेय. शहरात पालिकेची अनेक उद्याने आहेत.

Elephant Garden
Mapusa News: म्हापशात आरोग्य केंद्राची विशेष प्रतिबंधात्मक उपाययोजना, शहर होणार मलेरियामुक्त

मात्र मध्यवर्ती ठिकाणी असलेले पोस्ट कार्यालयाशेजारील चाचा नेहरु पार्क म्हणजे ‘हत्तीचे गार्डन’ या नावाने प्रचिलित उद्यान बालगोपाळांसाठी खेळण्यासाठी हक्काचे उद्यान.

सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत उद्यानात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसते. यावेळी बालचमू सी-सॉ, घसरगुंडी, झोका, शिडी आदी खेळांचा आनंद लुटतो. मात्र अपुरी खेळणी असल्याने मुलांची थोडी गैरसोय होते.

त्याचप्रमाणे राममनोहर लोहिया उद्यान देखील बालगोपाळांसाठी विरंगुळ्याचे केंद्र. याठिकाणी ज्येष्ठ मंडळी सायंकाळी वॉकिंगसाठी येतात तर बच्चे कंपनी आपली सायकल घेऊन फेरफटका किंवा फुटबॉल, क्रिकेट खेळताना दिसतात.

चाचा नेहरु पार्कमधील काही झोपाळे तुटलेले आहेत, जे दुरुस्त करण्याची गरज आहे. या उद्यानाबाहेर आईस्क्रीम किंवा अन्‍य विक्रेते थांबलेले दिसतात. त्यामुळे खेळून दमल्यानंतर ही मुले आपल्या घरच्यांसोबत या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात.

Elephant Garden
Mapusa Municipal Council: म्हापसा पालिकेचा 50 लाखांचा कर थकीत

काही उद्यानांकडे पालिकेचे दुर्लक्ष

शहरात इतरत्र ठिकाणी उद्याने आहेत. मात्र, मोडकळीस आलेली खेळणी, जागोजागी पडलेला कचरा, पाण्यावाचून सुकलेली हिरवळ यामुळे अंतर्गत प्रभागांमधील काही उद्यांनाकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याचे दिसते.

तितकीशी गर्दी तिथे दिसत नाही. अशा वेळी पालिकेने या उद्यानांतील सोयीसुविधांसोबत खेळणी वाढविण्याकडे व त्यांच्‍या देखरेखीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कोर्ट जंक्शन उद्यान, डांगी कॉलनी बालोद्यान येथील खेळण्‍याची उपकरणे तर दयनीय अवस्‍थेत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com