Mapusa Municipal Council: म्हापसा पालिकेचा 50 लाखांचा कर थकीत

दत्तवाडी व करासवाडा औद्योगिक वसाहतीमधील पालिकेचा कर सहा वर्षे थकीत आहे.
MAPUSA MUNICIPAL COUNCIL
MAPUSA MUNICIPAL COUNCILGomantak Digital Team
Published on
Updated on

Mapusa Municipal Council: म्हापसा येथील म्हापसा व करासवाडा औद्योगिक वसाहतीचा सुमारे 50 लाखांचा कर म्हापसा नगरपालिकेला देय आहे. मागील सहा वर्षे घरपट्टी कर औद्योगिक विकास महामंडळाने म्हापसा पालिकेत जमा केलेला नाही.

यासंदर्भात माहिती देताना म्हापसा पालिकेच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ यांनी सांगितले की, दत्तवाडी व करासवाडा औद्योगिक वसाहतीमधील पालिकेचा कर सहा वर्षे थकीत आहे.

या थकीत कराची रक्कम 50 लाखांवर पोचली आहे. आम्ही औद्योगिक वसाहत महामंडळाकडे संपर्क साधून या कराच्या वसुलीसाठी प्रयत्न करत आहोत.  

MAPUSA MUNICIPAL COUNCIL
Water Dispute: 'हा' प्रश्न सोडवण्यात सरकार अजूनही अपयशी, साबांखा मंत्र्यांचा कबुलीनामा

म्हापशात दत्तवाडी व करासवाडा-थिवी या दोन औद्योगिक वसाहती आहेत. या वसाहती सरकारकडून औद्योगिक विकास महामंडळामार्फत चालवल्या जातात. या महामंडळाकडूनच पालिकेला वसाहतीमधील कारखान्यांचा कर भरणा केला जातो.

 राज्यातील सर्व औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांचा घरपट्टी कर, इतर भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवाना यासारख्या आवश्यक परवान्यांचे शुल्क पूर्वी पालिका व पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वसूल केले जात होते.

MAPUSA MUNICIPAL COUNCIL
High Court of Bombay at Goa: पिसुर्ले गावातील शेतकऱ्यांना दिलासा, खंडपीठाने दिला 'हा' निर्णय

मात्र, या स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वसाहतीमधील कारखान्यांच्या मालकांची कर व शुल्काच्या नावे सतावणूक केली जात असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होता.

त्यानुसार बांधकाम परवाना व भोगवटा प्रमाणपत्र हे औद्योगिक महामंडळाकडूनच देणे तसेच संबंधीत कंपनींकडून कर वसूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीत जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com