Tweet War About Various Issues In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Tweeter War: 'गोव्यात येण्यापूर्वी जनरेटरची सोय आहे का चेक करा', महिला उद्योजक बोलली अन् सुरू झालंय 'ट्विटर वॉर'

गोव्यात येणाऱ्या समस्यांबाबत देशा विदेशातील लोक समाज माध्यमांवर त्यांची मतं व्यक्त करत असतात. गोव्यातील सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी, रस्ते किंवा वीज समस्या याबाबत लोक बोलत असतात.

Pramod Yadav

Tweet War About Various Issues In Goa: गोव्यात येणाऱ्या समस्यांबाबत देशा विदेशातील लोक समाज माध्यमांवर त्यांची मतं व्यक्त करत असतात. गोव्यातील सार्वजनिक वाहतूक, टॅक्सी, रस्ते किंवा वीज समस्या याबाबत लोक बोलत असतात.

दरम्यान, अशाच एका समस्येबाबत अहमदाबाद येथील आणि सध्या गोव्यात राहणाऱ्या एका उद्योजक महिलेने तिचे मत व्यक्त केले. पण त्यावरून आता ट्विटरवर शाब्दिक वॉर सुरू झालंय.

नेमका विषय काय?

तर, श्रुती चतुर्वेदी यांनी ट्विटरवरती गोव्यातील वीज समस्येबाबत एक ट्विट केले. जर तुम्ही गोव्यात राहण्याचा विचार करत असाल तर अशी सोसायटी शोधा जिथे त्यांचा जनरेटर असेल, जरी तुम्हाला मेन्टेनन्ससाठी जास्त पैसे द्यावे लागले तरी.

मागील पाच वर्षात एकही दिवस असा नाही ज्यादिवशी वीज पुरवठा खंडीत झाला नाही. अशा लढाईत उतरूच नका जी तुम्ही कधीच जिंकणार नाही. असे चतुर्वेदी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

यानंतर गोव्यासह देशभरातील अनेकांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. वादग्रस्त ठरलेल्या द काश्मीर फाईल्सचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी देखील यावर त्यांचे मत मांडले आहे.

जर गुरगावप्रमाणे गोव्यात राहायचे आहे, तर गोव्यात कोणी का जावे? असा प्रश्न विवेक अग्निहोत्री यांनी उपस्थित केला आहे. त्यावर कारण त्या लोकांना गुरगावमध्ये राहायचे नाही अशी खोचक प्रतिक्रिया चतुर्वेदी यांनी दिली आहे.

तसेच, गोवा खरच एवढा वाईट आहे का? असा प्रश्न एका वापरकर्त्याने विचारला त्यावर गोवा सुंदर आहे पण, येथील समस्या वाईट आहेत. असे उत्तर चतुर्वेदी यांनी दिलंय.

म्हापसा येथे कधीच वीज पुरवठा खंडीत होत नाही, देखभालीच्या काळात केवळ तीन तास वीज पुरवठा बंद होता अशी प्रतिक्रिया देण्यात आली. त्यावर अहमदाबादमध्ये फक्त 15 मि. वीज पुरवठा बंद असतो. असे चतुर्वेदी म्हणाल्या.

दरम्यान, याबाबत वाद झाल्यानंतर चतुर्वेदी यांनी आणखी एक स्पष्टीकरण देत त्यांचे मत मांडले. गोव्यातील वीज आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टींच्या कमतरतेकडे बाहेरच्या एखाद्या व्यक्तीने लक्ष वेधले तर, 'तुम्ही जिथून आलात तिथून परत जा' असे सांगतात.

पण आम्ही वेळेवर कर भरतो, सरकारने समस्या सोडवल्या पाहिजेत. पण, राजकारणाने आपली सामाजिक जडणघडण आणि नागरी जाण मलीन केली आहे. असे स्पष्टीकरण चतुर्वेदी यांनी दिले आहे.

या वादात सॅवियो रॉड्रिग्स यांनी देखील उडी घेत गोवन नसलेल्या लोकांना मी बाहेरचे लोक मानत नाही. पण, तुम्ही मांडलेली समस्या एवढी मानत नाही कारण त्याला उपाय देखील आहेत. अनेक घरात आणि ऑफिसमध्ये इनव्हर्टर आहेत. गोव्यात खूप छान आहे, तुम्ही नक्कीच येथे येण्याचा विचार करू शकता.

तसेच, गुजरातमध्ये वीज समस्या नाही असे तुमचे मत आहे का? फेब्रुवारी 2023 मध्ये 35 महानगरपालिकेत वीज समस्या निर्माण झाली होती. असेही सॅवियो रॉड्रिग्स यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT