Tree Fallen  Dainik Gomantak
गोवा

Tree Collapses: झाड कोसळून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू, पती उपचाराधीन

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा : शिरोडा पंचायतीच्या प्रभाग क्रमांक चारसाठी मतदान करून घरी परतणाऱ्या पती पत्नीच्या दुचाकीवर वडाचे झाड कोसळून पत्नीचा दुर्दैवी घटना आज बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातोरे - शिरोडा येथील व्यंकटेश घनशाम नाईक (वय 44) व त्याची पत्नी अदिती व्यंकटेश नाईक (वय 39) हे शिरोडा पंचायतीच्या प्रभाग क्रमांक चार मधील तारीवाडा येथील मतदान केंद्रात गेली होती. मतदान करून जीए 05 सी 8306 या दुचाकीने घरी परतत असताना शिरवाडा येथे पोचल्यावर रस्त्याच्या कडेला असलेले भले मोठे वडाचे झाड अचानक खाली कोसळले. या वडाच्या झाडाखाली दुचाकीसह नाईक दांपत्य सापडले त्यात अदिती नाईक ही गंभीर जखमी झाली. यावेळी लगतच्या घरातील लोकांनी घटना स्थळी धाव घेऊन झाडाच्या फांदीखाली अडकलेल्या आदितीला बाहेर काढले त्यानंतर दोघाही जखमी पती पत्नीला शिरोडा आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता . आदितीला तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.

नाईक दांपत्याला दोन मुले असून फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला. दरम्यान फोंडा अग्निशामक दलाला या दूर्घटने संबंधी कळवल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील झाड हटवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT