गोव्यात ग्रामपंचायत निवडणुकांसाठी एकूण 78.70 टक्के मतदान झाले आहे. कोणत्या तालुक्यात किती मतदान झाले त्याची आकडेवारी खालीलप्रमाणे:
केपे : 82.89 %
बार्देश 77.51%
सत्तरी 89.30%
धारबांदोडा 85.88%
डिचोली 89.27%
सांगे 84.86%
काणकोण 82.84%
मुरगाव 72.35%
तिसवाडी 75.85%
पेडणे 87.69%
फोंडा 80.20%
गोवा राज्यात 185 पंचायतीसाठी आज मतदान पार पडले. अद्याप मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली नाही. पण, जवळपास 80 टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कळंगुट येथील प्रभाग नंबर 09 साठी उद्या (गुरूवारी) सकाळी 08 ते 05 या वेळेत मतदान होणार आहे. मतदार यादीतील नाव आणि चिन्ह यात झालेल्या चूकीमुळे येथील मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. पंचायत निवडणूकीचा निकाल येत्या 12 ऑगस्टला जाहीर होणार आहे.
धारबांदोडा : 81.46%
केपे : 79.00%
मुरगाव : 66.17%
डिचोली : 82.44%
बार्देश : 72.05%
सत्तरी : 84.75
सासष्टी : 64.15%
काणकोण : 77.53%
केपे : 64.65%
धारबांदोडा : 65.50%
सांगे 65.39%
बार्देश : 56.52%
काणकोण : 64.85%
सासष्टी : 51.15%
सत्तरी: 68.87%
मुरगाव : 53.19%
डिचोली : 62.93%
तिसवाडी : 54.98%
फोंडा : 56.22%
काणकोण : 48.89%
धारबांदोडा : 45.25%
केपे : 48.50%
मुरगाव : 37.20%
डिचोली : 43.04%
बार्देश : 39.75%
फोंडा : 37.92%
सत्तरी : 48.21%
गोव्यात पंचायत निवडणुकीसाठी सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत 40 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यभरात मतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत असून काही अपवाद वगळता निवडणुकीत कोणताही अडथळा आलेला नाही. पोलिसांसह प्रशासनही निवडणूक पार पाडण्यासाठी सज्ज असून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सभापती रमेश तवडकर यांनी पैंगीण पंचायत, आमोणा येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर पैंगीण पंचायतीच्या निवडणुकीसाठी आमोणे वार्डातून उमेदवारी अर्ज भरला होता.
आज सुरू असलेल्या पंचायत निवडणुकांबद्दल अनेक राजकीय नेत्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. पंचायत निवडणुका या लोकशाहीचा पाया आहेत. त्यामुळे कोणत्याही राजकारण्यांनी पंचायत निवडणुकीत राजकारण करू नये, असे बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी सांगितले.
पंचायत निवडणुकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि त्यांची पत्नी सुलक्षणा सावंत यांनी पाळी कोठांबी येथे प्रभाग क्रमांक 9 साठी मतदान केले.
सत्तरी : 21.05%
सांगे : 22.17%
धारबांदोडा : 20.85%
काणकोण : 22.92%
सासष्टी : 16.78%
डिचोली : 19.76%
तिसवाडी : 17.97%
केपे : 23.40%
बार्देश : 19.02%
पेडणे : 21.79 %
मुरगाव : 17.88%
कळंगुटच्या वार्ड क्रमांक 9 साठी होणारी निवडणूक आता आजऐवजी उद्या पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे. उमेदवारांची नावं आणि चिन्ह यात विसंगती आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानासाठी केंद्रावर आलेल्या मतदारांचा मात्र यामुळे चांगलाच खोळंबा झाला. तांत्रिक घोळामुळे मतदारांना मतदान न करताच घरी परतावं लागलं आहे. आता उद्या परत निवडणुकीची प्रक्रिया पार पडणार असल्यामुळे पुन्हा मतदारांना केंद्रावर यावं लागणार आहे. कळंगुट पंचायतीच्या वार्ड 9 मधून 6 उमेदवार रिंगणात असून 950 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
सांताक्रुझ पंचायतीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून जटील बनलेली कचरा समस्याच्या मुद्यावर ही निवडणूक उमेदवार लढवत आहेत. पंचायतीच्या वेळोवेळी झालेल्या निवडणुकीत कचऱ्याचा मुद्दा उपस्थित होत आला आहे. मात्र आजपर्यंत त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे या निवडणुकीतही नवोदित उमेदवार ही समस्या धसास लावतील अशा अपेक्षेने मतदार उद्या मतदानाला सामोरे जाणार आहेत.
वयोवृद्धांची मतदानाला हजेरी
कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी मतदान केंद्रांवर गोवा पोलिस तैनात आहेत.
राज्यातील 186 पंचायतींच्या 1464 प्रभागांसाठी आज सकाळी 8 ते सायंकाळ 5 पर्यंत मतदान होत आहे. यासाठी तब्बल 5 हजार 38 उमेदवार रिंगणात आहे. मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य पोलिस बंदोबस्तात मतदान केंद्रावर पोहोचले आहे. पंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील 1 हजार 49 ठिकाणी 1566 मतदान केंद्रे उभा केली आहेत. यापैकी 45 मतदान केंद्र ही संवेदनशील मतदान केंद्र म्हणून जाहीर केलीत. मतदारांनी कोरोना नियमांचे पालन करून मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
डिचोलीत मतदानास थंड प्रतिसाद
डिचोली: पंचायत निवडणुकीच्या मतदानास सुरवात झाली असून, डिचोली तालुक्यातील काही मतदान केंद्रावर सकाळी सुरवातीचा एक तास प्रतिसाद 'थंड' असल्याचे दिसून आले. डिचोली तालुक्यातील 17 पंचायतींसाठी निवडणूक होत आहे.
तालुक्यातील अडवलपाल, साळ, मेणकूरे-धुमासे, लाटंबार्से, मुळगाव, शिरगाव, पिळगाव, नार्वे, वन-म्हावळींगे, कारापूर-सर्वण,मये-वायंगिणी, आमोणे, कुडणे, न्हावेली, सूर्ल, वेळगे आणि पाळी-कोठंबी या पंचायतींसाठी निवडणुका होत आहेत.
कोरोनाबाधित मतदारांना मतदानाचा अधिकार
निवडणुकीत कोरोनाबाधित मतदारांना शेवटच्या तासात (4 ते 5 या वेळेत) मतदानाचा अधिकार मिळणार आहे. पंचायत राज कायद्यात तरतुदीअभावी 80 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना मतपत्रिकेची सुविधा नाही. त्यांना मतदान केंद्रावरच मतदान करावे लागणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.