Goa Spa Molestation Dainik Gomantak
गोवा

मसाजसाठी गेली अन् नकोसा अनुभव आला, गोव्यातील स्पा सेंटरमध्ये महिला पर्यटकाचा विनयभंग; वार्का येथील प्रकाराने खळबळ

Goa Spa Molestation: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात एका महिला पर्यटकासोबत गैरप्रकार घडल्याची संतापजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

कोलवा: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यात एका महिला पर्यटकासोबत गैरप्रकार घडल्याची संतापजनक घटना समोर आली. दक्षिण गोव्यातील कोलवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या वार्का येथील एका स्पा सेंटरमध्ये मसाजसाठी गेलेल्या महिला पर्यटकाचा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 16 डिसेंबर रोजी घडली. पीडित महिला (Women) पर्यटक वार्का येथील एका नामांकित स्पा सेंटरमध्ये मसाज सुविधेचा आनंद घेण्यासाठी गेली होती. मसाज सुरु असताना तेथील एका कर्मचाऱ्याने तिच्याशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा आरोप पीडितेने केला. या प्रकारानंतर पीडित महिलेने तत्काळ पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली.

पोलिसांची कारवाई

कोलवा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम 79 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरु केला. आरोपी महिला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, नेमका प्रकार काय होता आणि त्यामागे काय उद्देश होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.

"आम्ही पीडित महिलेच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची ओळख पटली असून लवकरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. पर्यटकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे," असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

पर्यटन क्षेत्रावर परिणाम?

गोवा (Goa) हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ आहे. मात्र, अशा घटनांमुळे राज्याच्या प्रतिमेला तडा जाण्याची शक्यता असते. विशेषतः स्पा आणि मसाज सेंटर्समध्ये महिला पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली असावी, अशी मागणी आता स्थानिक आणि पर्यटकांकडून केली जात आहे. पोलीस सध्या स्पा सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT