Vagator Accident News Dainik Gomantak
गोवा

Vagator Accident News: धक्कादायक! एकीकडे दिवाळीची धामधूम तर वागातोरमध्ये गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू

मायोर रोमा रिसॉर्ट (Maior Roma Resort) च्या मालकीण रेमाडिया मारिया यांचा मृत्यू झाला

Kavya Powar

Vagator Accident News: दिवाळीनिमित्त सर्वत्र धामधूम आणि उत्साहाचे वातावरण असतानाच एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. वागातोरमध्ये एका महिलेचा गाडीखाली चिरडून मृत्यू झाला आहे. वागातोरमध्ये असलेल्या मायोर रोमा रिसॉर्ट (Maior Roma Resort) च्या मालकीण रेमाडिया मारिया यांचा मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, 57 वर्षीय रेमाडिया मारिया आपल्या रिसॉर्टच्या दारात फोनवर बोलत उभ्या होत्या. त्याचवेळी समोरून भरधाव वेगात एक SUV कार आली जी थेट रेमाडिया यांच्या अंगावर गेली.

सदर घटना इतक्या जलद झाली रेमाडिया यांना प्रसंगावधान राखण्याची संधीच मिळाली नाही. या कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. कार HR-13-G- 1831 या क्रमांकाने नोंदणीकृत असून चालक बाहेरचा आहे. कार चालवत असताना चालकाने मद्यप्राशन केले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

VIDEO: अभिषेक शर्माला राग नडला! मैदानात 'अश्लील शब्द' वापरल्यामुळे 'BCCI'चा मोठा दणका; मॅच फीमध्ये मोठी कपात

VIDEO: वीजांचा गडगडाट! गोव्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; काही ठिकाणी झाडे कोसळली

SCROLL FOR NEXT