Agriculture Land : शेतजमिनी न विकता श्रम करून उत्पादन घ्या : कृषिमंत्री रवी नाईक

Agriculture Land : लोकांना यापुढे घरपोच रेशन धान्य देण्यात येईल. फुकट मिळते म्हणून रिकामे न राहता शेती करायलाच हवी.
land
land Dainik Gomantak
Published on
Updated on

Agriculture Land : पेडणे, आमच्या पूर्वजांनी घाम गाळून शेती केली. अशा शेतजमिनी विकून न टाकता त्यात श्रम करून उत्पादन घ्या व भावी पिढीसाठी सांभाळून ठेवा. लोकांना यापुढे घरपोच रेशन धान्य देण्यात येईल. फुकट मिळते म्हणून रिकामे न राहता शेती करायलाच हवी.

कुळ हक्क कुळांना मिळायला हवा व कुळांना जमिनी मिळतात की नाही यावर आमदारांनी लक्ष ठेवावे, असे प्रतिपादन नागरी पुरवठा तथा कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले. ते पेडणे तालुका नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार खात्याच्या नव्या कार्यालयाचे उद्‍घाटन केल्यानंतर बोलत होते.

यावेळी पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, नागरी पुरवठा खात्याचे संचालक जयंत तारी उपस्थित होते.

land
Goa Sports News: क्रीडापटू विद्यार्थ्यांना दिवाळी भेट

मंत्री रवी नाईक पुढे म्हणाले, की जनता कर भरते म्हणून सरकारे चालतात. त्यासाठी जनतेला जास्तीत जास्त सुविधा देणे सरकारचे कर्तव्य आहे.

आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, की शेतकऱ्यांच्या समस्या मी विधानसभेत मांडून त्याचा पाठपुरवा करीन. पेडणे सरकारी कार्यालये असलेली इमारत जुनी झालेली आहे, ती पाडून नवी इमारत लवकरच बांधण्यात येणार आहे.

नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर यांचेही भाषण झाले. निरीक्षक राजीव सावंत यांनी सूत्रसंचालन केले. योगेश तळवणेकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com