Jail|Arrest  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यातील चेन स्नॅचिंगच्या २५ प्रकरणांमधला Most Wanted गुन्हेगार फिरत होता गोकर्णमध्ये, असा पोलिसांच्या तावडीत सापडला

Goa Crime News: महिलांच्‍या सोनसाखळ्या लांबवणाऱ्या आणि लोकांना अडवून लुटणाऱ्या आगुस्‍तीन कार्व्हालो या कुख्‍यात चेन स्‍नॅचरला कर्नाटक पोलिसांनी गोकर्ण येथे अटक केली

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Latest News Today

मडगाव: गोव्‍यात वेगवेगळ्‍या ठिकाणी महिलांच्‍या सोनसाखळ्या हिसकावून लांबवणाऱ्या आणि अडगळीच्‍या जागेवर लोकांना अडवून त्‍यांना लुटणाऱ्या आगुस्‍तीन कार्व्हालो या कुख्‍यात चेन स्‍नॅचरला कर्नाटक पोलिसांनी शेवटी गोकर्ण येथे काल अटक केली.

या चोरट्याला सध्‍या पर्वरी पोलिसांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले आहे. या कुख्‍यात गुन्‍हेगाराच्‍या विरोधात गोव्‍यात वेगवेगळ्‍या पोलिस स्‍थानकात २५ हून जास्‍त गुन्‍हे नोंद झाले असून त्‍यातील काही गुन्‍ह्यात त्‍याला शिक्षाही झालेली आहे.

आगुस्‍तीन कार्व्हालो हा माजोर्डा येथे रहाणारा असून मागचे काही महिने तो फरार होता. गोव्‍यातील काही गुन्‍ह्यात तो गोवा पोलिसांना हवा होता. त्‍यामुळे त्‍याच्‍या विरोधात लुकआऊट नोटीस जारी केली होती. काल कर्नाटक पोलिसांना तो गोकर्ण परिसरात फिरताना सापडल्‍याने तिथे त्‍याला अटक केली.

वाटेत निर्जनस्‍थळी सापडलेल्‍या महिलांना गाठून त्‍यांच्‍या अंगावरील चेन्‍स चोरण्‍याच्‍या तसेच रात्रीच्‍यावेळी ट्रक चालकांना अडवून आपण पोलिस असे सांगून त्‍यांना लुटण्‍याच्‍या अनेक घटनात कार्व्हालो याचा हात असून काही महिन्‍यापूर्वी त्‍याने कोलवा येथे एका विक्रेत्‍यालाही अशीच धमकी देऊन पैसे उकळले होते. किनारी भागातील व्‍यावसायिकांना तो आपण पोलिस असल्‍याचे सांगून त्‍यांना धमकावून त्‍यांच्‍याकडून पैसे काढून घेत होता.

तोतया पोलिस म्‍हणून गुन्‍हेगारी वर्तुळात परिचित या आगुस्‍तीन विरोधात मडगाव पोलिसात ८, मायणा कुडतरी पोलिसात ५, कोलवा आणि केपे पोलिस स्‍थानकात प्रत्‍येकी दोन तर हणजुणा, आगशी, पर्वरी, ओल्‍ड गोवा, मुरगाव, कुंकळ्‍ळी, पेडणे व वेर्णा पोलीस स्‍थानकात प्रत्‍येकी एक गुन्‍हा नोंद झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Goa: जीप समुद्रकिनाऱ्यावर घेऊन जाणं पर्यटकास पडलं महागात, पोलिसांनी ठोठावला दंड

SCROLL FOR NEXT