Goa Crime News: सोळा वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पर्वरीत गुन्हा दाखल
Goa Rape CaseDainik Gomantak

Goa Crime News: सोळा वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पर्वरीत गुन्हा दाखल

Goa Crime News: प्रकरण उघडकीस आल्यानंतर पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
Published on

Goa Crime News

पर्वरी: सोळा वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी सोळा वर्षीय मुलाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. मंगळवारी (२० ऑगस्ट) हा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोळा वर्षीय मुलाने १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पर्वरी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरु आहे.

Goa Crime News: सोळा वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पर्वरीत गुन्हा दाखल
विश्रांतीनंतर पुन्हा बरसणार, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता; चार दिवस 'यलो अलर्ट'

कोलकाता, बदलापुरातील घटनेवरुन उद्रेक

कोलकाता येथील आर जी कर वैद्यकीय रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन हत्या केल्याची घटना घडली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटले.

ही घटना ताजी असताना महाराष्ट्रातील बदलापूर येथे एका नामांकीत शाळेत शिक्षण घेणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यावरुन आज (मंगळवारी, २० ऑगस्ट) या प्रकरणातील संशयिताला फाशी द्या अशी मागणी करत बदलापूर रेल्वे स्थानाकात रेल्वे रुळांवर उतरून नागरिकांनी रेल्वेमार्ग रोखून धरला.

पोलिसांनी समजावून देखील नागरिकांनी माघार घेतली नाही. तब्बल दहा तास या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com