Divya Rane News Dainik Gomantak
गोवा

शेतकऱ्यांच्या मुलभूत समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार दिव्या राणे

शेतकरी सेवा सहकारी संस्थेने एका चांगल्या उपक्रमाला सुरुवात केली आहे : राणे

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले : शेतकरी मजबूत असला तरच देश मजबूत होईल, त्यामुळे शेतकऱ्यांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आपण सुरू केला असून, त्या अनुषंगाने संबंधीत खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेण्यात येत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळात मुबलक प्रमाणात पाणी व वीज सेवा मिळणार असल्याची ग्वाही पर्ये मतदार संघाच्या आमदार तथा राज्य वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा डॉ दिव्या राणे यांनी अडवई सत्तरी येथे सत्तरी तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नर्सरीच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना दिली. (will work towards solving farmers' problems says Divya Rane)

या वेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गावस, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, भिरोंडा पंचायतीच्या सरपंच तेरेजा आद्राद, सहकार खात्याचे डिचोलीचे उपनिबंधक पंकज मराठे, वाळपई कृषी खात्याचे अधिकारी विश्वनाथ गावस, होंडा जिल्हा पंचायत सदस्य तथा संस्थेचे उपाध्यक्ष सगुण वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी पुढे बोलताना आमदार डॉ दिव्या राणे यांनी सांगितले की शेतकरी सेवा सहकारी संस्थेने एका चांगल्या उपक्रमाला सुरुवात केली आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळून माफक दरात सर्व प्रकारच्या फळ झाडांचे रोपे उपलब्ध होणार आहे. या कामी त्यांना वाळपई कृषी खात्याचे अधिकारी विश्वनाथ गावस यांनी सहकार्य केले या बद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. येणाऱ्या काळात सदर संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना सेंद्रिय खत पुरवठा करून शेती त्या खतांच्या आधारावर करावी, सदर खतांच्या आधारावर पिकविलेल्या शेतीच्या उत्पादनाला आज सर्वत्र मोठी मागणी आहे. या नर्सरीचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घेऊन सत्तरी तालुका शेती उत्पादनात स्वयंपूर्ण बनवावा त्या साठी सरकारच्या माध्यमातून लागणारे सहकार्य दिले जाईल असे राणे यांनी सांगितले.

यावेळी सहकार खात्याचे उपनिबंधक पंकज मराठे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सदर संस्थेच्या वतीने अर्थ पुरवठा करतानाच शेती उत्पादन वाढीसाठी सुरू केलेली नर्सरी योजना चांगली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक दरात विविध प्रकारची रोपे शेतकऱ्यांना घरपोच स्वरूपात उपलब्ध करून दिल्यास त्याचा चांगला परिणाम होणार आहे, सहकार खात्याच्या वतीने जे काय सहकार्य देणे शक्य आहे ते दिले जाईल असे आश्वासन दिले.

वाळपई कृषी खात्याच्या वतीने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्यासाठी पुढे आले पाहिजे. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांना डिजीटल मोड द्वारे शेती संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. सत्तरी तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असून त्याचा फायदा शेती उत्पादन वाढीसाठी होणार आहे असे उद्गार वाळपई कृषी खात्याचे अधिकारी विश्वनाथ गावस यांनी काढले.

सुरवातीला फित कापून तसेच समई प्रज्वलित करून नर्सरीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सदर नर्सरी सुरू करण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल शांताबाई शांताराम देसाई यांचा संस्थेच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग गावस यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक सयाजी देसाई, केले तर उपाध्यक्ष सगुण वाडकर यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण!देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

Yuri Alemao: 'नोकरी घोटाळ्यातील सूत्रधार समोर यावा'! 'Cash For Job' वरुन आलेमाव यांची मागणी

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

SCROLL FOR NEXT