क्रिकेट ‘मार्गदर्शक’ स्वप्नील अस्नोडकर ‘विशेष श्रेणी’त

एनसीए प्रशिक्षक अभ्यासक्रम : हायब्रिड लेव्हल-2 परीक्षेत 76.3 टक्के गुण
Swapnil Asnodkar
Swapnil AsnodkarDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : निवृत्तीनंतर मार्गदर्शकाच्या भूमिकेत स्थिरावलेले गोव्याचे माजी रणजी क्रिकेट संघ कर्णधार स्वप्नील अस्नोडकर यांनी आणखी एक मैलाचा दगड गाठला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने (एनसीए) प्रशिक्षकांसाठी घेतलेल्या हायब्रिड लेव्हल-2 अभ्यासक्रमात स्वप्नील यांनी यश मिळविले असून ते विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाले. (cricket coach Swapnil Asnodkar in goa)

Swapnil Asnodkar
Sourav Ganguly News: सौरव गांगुलीने राजीनाम्याच्या मुद्यावर सोडले मौन

स्वप्नील यांनी प्रशिक्षक हायब्रिड लेव्हल-2 परीक्षेत 76.3 टक्के गुण मिळविले. त्यामुळे ते लेव्हल-3 अभ्यासक्रमासाठी पात्र ठरले आहेत. ही माहिती एनसीए क्रिकेट प्रमुख व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी गोवा क्रिकेट असोसिएशनला पाठविलेल्या पत्रात नमूद केली आहे. या पत्रानुसार, हायब्रिड लेव्हल-२ अभ्यासक्रम परीक्षेत ७० टक्के व जास्त गुण मिळविणारे लेव्हल-3 साठी पात्र आहेत.

एनसीएतर्फे अभ्यासक्रम 20 ते 23 फेब्रुवारी 2021 आणि नंतर बंगळूर येथे 27 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 या कालावधीत घेण्यात आला. स्वप्नीलचा यांचा या अभ्यासक्रमातील दुसऱ्या तुकडीत समावेश होता.

Swapnil Asnodkar
गोव्यातील अधिकांश क्रिकेट सामने ‘टर्फ’वर

गोव्याच्या प्रशिक्षकपदी छाप

गोवा क्रिकेट असोसिएशनने स्वप्नील यांची स्पर्धात्मक क्रिकेटमधील निवृत्तीनंतर प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. दोन मोसमापूर्वी त्यांच्याकडे 23 वर्षांखालील, तर यंदा 25 वर्षांखालील संघाची सूत्रे होती. गोव्याने यंदा २५ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. याच वयोगटातील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेत गोव्याने हिमाचलविरुद्ध विजयाची नोंद केली.

गोव्यातर्फे सर्वाधिक रणजी धावा

स्वप्नील सध्या 38 वर्षीय आहेत. गोव्यातर्फे त्यांनी 84 रणजी क्रिकेट सामन्यांत 14 शतकांसह त्यांनी सर्वाधिक 5731 धावा केल्या आहेत. एकंदरीत 4 दुलिप करंडक सामन्यांसह त्यांनी 88 प्रथम श्रेणी सामन्यांत 40.02 च्या सरासरीने 5883 धावा नोंदविल्या आहेत.

शदाब, सगुण यांचेही यश

एनसीए हायब्रिड लेव्हल-2 अभ्यासक्रमाची परीक्षा गोव्याचे माजी रणजी कर्णधार सगुण कामत व शदाब जकाती यांनीही दिली होती. या परीक्षेत शदाब 68 टक्के, तर सगुण 61 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाले. निवृत्तीनंतर शदाबही प्रशिक्षक बनले आहेत. गतमोसमात ते उत्तर प्रदेशच्या 25 वर्षांखालील संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com