Will West Bengal CM Mamata Banerjee  
गोवा

बंगाली दीदीमुळे गोव्यातील राजकीय बकऱ्यांची बोली

पाच लाखापासून पंचवीस लाखापर्यंत सरपंच, नगरसेवक यांची खरेदी होणार आहे. पैशासाठी तत्व सत्व विकणाऱ्या बकऱ्यांची खरेदी होऊ दे, असे मतदार म्हणतात.

दैनिक गोमन्तक

बंगाली दीदीमुळे राजकारण करीत असलेल्या अडेल, पडेल उमेदवार, आजी माजी नगरसेवक, सरपंच पंच यांची खरेदी खेड्या पाड्यात सुरू झाली आहे. प्रत्येकाचा दर निश्चित करण्यात आला आहे. बाजारात बकरे खरेदी करावे तसे राजकारणात काम करणाऱ्या राजकीय बकऱ्यांची बोली लावली जात आहे. केवळ पैसे चारल्याने टीएमसीसाठी पाया घट्ट होईल यासाठी आता समाजसेवक, राजकारणी, स्वराज संस्था, स्वायत्त संस्थांमधील बकऱ्यांच्या शोधात बंगाली लोक सांगेत फिरू लागले आहेत. पाच लाखापासून पंचवीस लाखापर्यंत सरपंच, नगरसेवक यांची खरेदी होणार आहे. मतदार म्हणतात पैशासाठी तत्व सत्व विकणाऱ्या बकऱ्यांची खरेदी होऊ दे पुढे काय करायचे ते करूया.

गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार लुइझिन्हो फालेरो यांनी कोलकाता गाठून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर लुइझिन यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. लुइझिन यांच्यासह इतर नऊ नेतेही टीएमसीमध्ये सामील झाले. आता विधानसभा निवडणूकिच्या पार्श्वभूमिवर लुइझिन यांच्या मदतीने गोव्यात पक्ष विस्तारा करण्यावर टीएमसीचा डोळा आहे की काय, अशी अटकळ बांधली जात होती. आता या राजकिय चर्चेचे चित्र जवळपास स्पष्टच झाले आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी स्वत: गोवा दौऱ्यावर येणार आहेत. 28 ऑक्टोबरला ममता बॅनर्जी गोव्यात पोहोचणार आहेत. 28 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गोवा दौऱ्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून आपले गोवा निवडणूकीसंबधीचे विचार व्यक्त केले. 28 ऑक्टोबरपासून माझ्या पहिल्या गोवा दौऱ्याची तयारी करत असताना, मी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्याच्या फुटीरतावादी अजेंड्याला पराभूत करण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन करते, असे त्यांनी ट्विट करत म्हटले आहे.

ममता बॅनर्जी यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे लिहिले की, गेल्या 10 वर्षांत गोव्यातील जनतेने खूप त्रास सहन केला आहे. आता पुढे नवीन सरकार स्थापन करून आम्ही गोव्याची नवी पहाट सुरू करू. हे खरोखर गोव्यातील लोकांचे सरकार असेल आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असेल. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांचा पक्ष प्रथमच गोवा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरण्याच्या तयारीत आहे. गोवा दौऱ्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व राजकीय पक्ष, व्यक्ती आणि संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले आणि गोव्यात युती करण्यास आपली हरकत नसल्याचेही स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

Curchorem Accident: कुडचडे पोलीस ठाण्यासमोर अपघात, एकाच वेळी तीन गाड्या आणि दुचाकीची धडक; एकजण जखमी

Rohit Sharma: ‘देशाला तुझी अजून 5 वर्षे गरज...’, रोहित शर्माच्या निवृत्तीवर भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Goa Crime News: वास्कोत क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, बिहारचे तिघे अटकेत; लाखोंचा मुद्देमाल जप्त

एका वर्षात चौथा मृत्यू, झोपेतच विद्यार्थ्याचा गेला जीव; BITS Pilani कॅम्पसमधील घटनेने हळहळ

SCROLL FOR NEXT