दिल्लीत सोनिया गांधींचा क्लास,गिरीश चोडणकरांचीही उपस्थिती

गोवा विधासभेच्या दृष्टीने काँगेसने राज्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. काँगेसचे ज्येष्ठ नेते पि. चिदंबरम यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपावली आहे
Sonia Gandhi calls congress PCC president  meeting in Delhi
Sonia Gandhi calls congress PCC president meeting in Delhi Twitter @INCIndia

काँग्रेस (Congress) अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी आज दिल्लीत देशातील सर्वच राज्यांतील काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची काँगेस मुख्यालयात (Congress Committee Meeting) बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्षाला बळकटी देऊन पुढील ध्येयधोरणांबाबत चर्चा होणार आहे.त्याचबरोबर देशात अनेक राज्यात काँग्रेस सध्या अस्थिर आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्शवभूमीवर या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. (Sonia Gandhi calls congress PCC president meeting in Delhi)

त्याचबरोबर गोवा विधासभेच्या दृष्टीने काँगेसने राज्यावरही लक्ष केंद्रित केले आहे. काँगेसचे ज्येष्ठ नेते पि. चिदंबरम यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपावली आहे या बैठकीला काँगेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर देखील दिल्लीत उपस्थित असणार आहेत. गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला वारंवार अपयश येत आहे. विधानसभा निवडणुकांत काँग्रेसची कामगिरी अपेक्षेनुसार होत नाही. त्याचा फायदा भाजपला मिळत असून, अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत आहेत आणि याच अनुषंगाने दिल्लीत होणारी आजची बैठक महत्वाची मानली जात आहे.

दरम्यान येत्या काही काळात देशात गोव्यासह मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये ​विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या पाचही राज्यांतील निवडणूक स्थिती आणि काँग्रेसच्या रणनितीवर या बैठकीत सोनिया गांधींच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. गोवा विधानसभा डोळ्यासमोर ठेवता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चोडणकर आणि सोनिया गांधी यांच्यात थेट चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

Sonia Gandhi calls congress PCC president  meeting in Delhi
तृणमूलच्या ‘त्या’ कार्टूनवर भाजपची आक्रमक भुमिकी

तर दुसरीकडे गोवा विधानसभेत विजयासाठी काँग्रेस जोरदार तयारी करताना दिसत आहे. पक्षाचे अनेक नेते सध्या गोव्यात ठाण मांडून आहेत. आणि येत्या काही दिवसांत राहुल गांधी हे देखील गोवा दौरा करणार आहेत. काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार येत्या ३० ऑक्टोबर रोजी काँग्रेसनेते राहुल गांधी गोव्यात येणार आहेत. राहुल गांधी हे सभा घेऊन कार्यकर्त्यांना सभोंदीत देखील करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com