Babush Monserratte Dainik Gomantak
गोवा

मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या पाहणीनंतर सोनसोडो प्रश्‍न सुटणार का?

मोन्सेरात यांच्या भेटीकडे नगरपालिकेचे लक्ष

दैनिक गोमन्तक

सासष्टी: गेल्या अनेक वर्षांपासून सोनसोडो कचराप्रश्‍न केवळ मडगावकर किंवा सासष्टीकरांनाच सतावतोय असे नव्हे; तर संपूर्ण गोव्यात सोनसोडो कचराप्रश्‍न चर्चेचा विषय बनला आहे. मडगाव व परिसरात लोकसंख्या वाढल्यामुळे कचराप्रश्‍न अधिकच जटिल झाला असून, भल्याभल्यांना तो सोडवणे शक्य झालेले नाही. त्यामुळे आता कचरा व्यवस्थापनमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या भेटीकडे नगरपालिका व मठग्रामस्थ आशेने पाहात आहेत.

या आठवड्याच्या शेवटी मोन्सेरात सोनसोडोला भेट देण्याची शक्यता आहे. त्यांच्या भेटीसाठी मडगाव नगरपालिकेने तयारी सुरू केली असून, त्यांच्याकडून हा प्रश्‍न सोडवून घेण्यास नगरपालिका तत्पर आहे.

यापूर्वी कित्येक मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांनी सोनसोडो प्रश्‍न सोडवण्यासाठी भेटी देऊन आपल्या परीने प्रयत्न केले. मात्र एकालाही त्यात यश आलेले नाही. 2007 मध्ये जेव्हा दिगंबर कामत मुख्यमंत्री झाले तेव्हा, नंतर मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना तसेच सध्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीसुद्धा सोनसोडो कचऱ्याला आग लागली होती तेव्हा भेट देऊन पाहणी केली व प्रश्र्न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT