तळावली-बाणावली पुलाचे काम अर्धवट...

साळ नदीच्या पात्रात या पुलाची कमान तेवढी उभी
Work on Navelim
 bridge is incomplete
Work on Navelim bridge is incompleteDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: गेले दीड तप अधांतरी अवस्थेत असलेल्या तळावली-बाणावली पुलाचे भाग्य आता तरी उजळेल का, असा प्रश्‍न नावेली व बाणावलीवासीय आता करू लागले आहेत. साळ नदीच्या पात्रात या पुलाची कमान तेवढी उभी आहे. दोन्ही किनारे जोडले न गेल्याने या कमानीचा वापरही करता येत नाही, अशा अवस्थेत हा पूल लोंबकळत पडला आहे.2007 मध्ये नावेलीतून निवडून आल्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री बनलेल्या चर्चिल आलेमाव यांनी साळ नदीवर तीन पुलांची योजना आखली होती.

Work on Navelim
 bridge is incomplete
मडगाव शहराला जुगाराचा 'विळखा'

वार्का तसेच असोळणे-केळशी हे पूल पूर्णही केले; तर तळावली नावेली येथील पूल अर्धवट राहिला होता. नंतर ते पराभूत झाले. त्यांचा पराभव केलेल्या आवेर्तान फुर्तादो यांनी त्या पुलाला विरोध केल्याने झालेले बांधकाम तसेच अर्धवट राहिलेले आहे.

ताज्या निवडणुकीत पुलाचे विरोधक आवेर्तान तसेच समर्थक चर्चिल हे पराभूत झालेले असल्याने सरकार आता तरी अर्धवट स्थितीतील हा पूल पूर्ण करणार का, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. दरम्यान, माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो यांनी या पुलाचे काम पुन्हा हाती घेण्यास आपला अजूनही विरोध असेल; कारण त्याच्या जोडरस्त्यासाठी अनेक घरे व कंपाऊंड पाडावी लागतील, असे स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com