Wild Animals Dainik Gomantak
गोवा

जंगली प्राण्यांकडून शेतीचे नुकसान; सरकारी उपाय योजनांची गरज

पिकांचे नुकसान : बंदोबस्तासाठी कडक उपाययोजनांची गरज

दैनिक गोमन्तक

वाळपई Wild Animals: सरकारने (Government) आत्मनिर्भर, स्वयंपूर्ण संकल्पना राबविली आहे. त्याप्रमाणे राज्यात (State) अनेक जणांनी स्वयंपूर्णतेच्या बाबतीत पाऊल उचलले आहे. सत्तरी तालुक्यात युवकांनी पुढाकार घेऊन शेतीत (Farm) विविध प्रयोग केले. पण अनेक वर्षापासून बागायती करणारा बळीराजा (Farmers) सध्या मात्र मोठ्या संकटात सापडला आहे. कबाड कष्ट करून उभी केलेली सुपारी, नारळ, केळी अन्य पिकाची (Crops) बागायत वन्य उपद्रवी प्राण्यांना आयतेच भक्षणासाठी लाभदायी ठरत आहे.

आता सरकारला जाग येऊन माकड, खेती या वन्यप्राण्यांना उपद्रवी घोषित करून त्यांच्या बंदोबस्तासाठी कडक उपाय योजना कराव्या, अशी मागणीही ग्रामसभा, शेतकरी संघटनेतर्फे करण्यात येत आहे.

वन्यप्राण्यांच्या निर्बंधासाठी शेतकऱ्यांचे २०१६ सालापासून आंदोलन सुरू असून त्याचे फलित म्हणून रानडुकराला मारण्याची परवानगी दिली. पण त्या निर्णयाबरोबरच माकड, खेती यांनाही मारण्याची परवानगी दिली असती व बंदूक परवाना देणे, या गोष्टी विचाराधीन होण्याची गरज होती. सरकारला निवेदने अनेकवेळा दिली आहेत. जवळपास साडेचार हजार निवेदने दिली आहेत. तरी देखील गांभीर्याने प्रश्न हाताळलेला नाही.

जंगलात आकेशियाची नको असलेली झाडे वनखात्याने लागवड केली आहे. त्यामुळे जंगलातील प्राण्याचे अन्नच नष्ट झाले आहे. त्यामुळेही कदाचित वन्य प्राणी अन्नाच्या शोधात लोकवस्तीत, बागायतीत येत असावेत, असेही शेतकऱ्यांचे मत आहे.

बागायतीचे रक्षण करा

परवाना देणे जमत नसेल तर सरकारनेच प्रत्येक गावात शूटर नियुक्त केले पाहिजे. वन्यप्राण्याचे आक्रमण असताना उत्पन्न दुप्पट कसे करायचे? याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. परवाना देत नसतील, तर वनखात्याने रानटी प्राणी संभाळले पाहिजे. सीमा भागात कुंपण घालून उंच भिंती बांधल्या पाहिजेत. जेणेकरून लोकवस्तीत जनावरे येणार नाहीत. हवे असल्यास शेतीचे अनुदान बंद करून तो पैसा कुंपणे बांधण्यासाठी वापरा. पण शेती बागायतीचे रक्षण करा असा सूर व्यक्त होत आहे.

रानडुकरांना मारायचे कसे?

हल्लीच सरकारने रानडुकराला उपद्रवी म्हणून मारण्याची परवानगी दिली खरी, पण हे रानडुक्कर मारायचे तरी कसे? त्यातही वनखात्याची परवानगी घ्यावी, अशा जाचक अटी ठेवण्यात आलेल्या आहेत. डुक्कर मारायचा तरी कसा? बंदुकीने की कोयत्याने हा विचार करणारा विषय बनला असून सरकारने बंदूक परवाना देणे, त्याचे नूतनीकरण करणे याही गोष्टी तेवढ्याच गांभीर्याने घेतल्या नाहीत. रानडुक्कर बरोबरच माकड, खेती हे देखील वन्यप्राणी उत्पन्नाचे प्रचंड प्रमाणात नुकसान करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Farmers Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

8th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांचे लक्ष मुंबईच्या बैठकीकडे! सॅलरी वाढीबाबत काय आहे नवा प्लान? 8व्या वेतन आयोगाचे 5 मोठे हायलाइट्स

Ranji Trophy 2026: पिठिया, भार्गवच्या फिरकीचा गोव्याला फटका! बडोद्याने फॉलोऑन लादला; पराभवाची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT