Goa AAP Press Conference Dainik Gomantak
गोवा

Goa AAP:...मग माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर का नाही दाखल केला गुन्हा? आपचा गोवा मुख्यमंत्र्यांना सवाल

Cash For Job Scam Goa: ईडीचा दुरोपयोग करु नका. आम आदमी पक्ष क्रांती आणि आंदोलनातून वर आला आहे, असे आपचे नेते पत्रकार परिषदेत म्हणाले.

Pramod Yadav

Cash For Job Scam Goa

पणजी: गोव्यात गाजत असलेल्या कॅश फॉर जॉब स्कॅम प्रकरणाचा तपास ईडीने सुरु केला आहे. याप्रकरणात अनेकांना अटक करण्यात आलीय. तसेच, अनेक नावे समोर येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सावंत यांच्या पत्नीचे यात नाव घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. याला आता आपने प्रत्युत्तर दिले आहे.

आम आदमी पक्षाच्या वतीने याप्रकरणी आज (१२ डिसेंबर) पणजीत पत्रकार परिषद घेण्यात आली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बदनामी प्रकरणी तक्रार दाखल करण्यात वेळ वाया घालवू नये. आम्ही दाखल करतो तक्रार त्यांनी तपासावर लक्ष केंद्रीत करावे, असे आपने म्हटले आहे.

असे असेल तर माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याविरोधात बदनामीची केस का दाखल केली नाही. गोव्यातल्या नागरिकांना धमकावण्यासाठी ईडीचा दुरोपयोग करु नका. आम आदमी पक्ष क्रांती आणि आंदोलनातून वर आला आहे, असे आपचे नेते पत्रकार परिषदेत म्हणाले.

आम्ही माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना गोव्यात येण्यासाठी आमंत्रण दिले आहे आणि ते देखील गोव्यात येण्यासाठी तयार आहेत. आम्हाला त्यांच्याकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे, असे आप नेते म्हणाले. पत्नीवर घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या एकालाही सोडणार नाही. त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री सावंतांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT