Cash For Job Scam: पत्नीवर आरोप करताच मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले, म्हणाले, एकालाही...
Goa Chief Minister Pramod SawantDainik Gomantak

Pramod Sawant: एकालाही सोडणार नाही! पत्नीवर घोटाळ्याचा आरोप करणाऱ्यांवर होणार कायदेशीर कारवाई; सीएम सावंतांचा इशारा

Goa Chief Minister Pramod Sawant: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात माझ्या पत्नीवर विरोधकांकडून खोटे आरोप करण्‍यात येत आहेत. माझी पत्नी सरकारच्या कोणत्याच प्रशासकीय कामात सहभागी होत नाही.
Published on

वास्‍को: ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणात माझ्या पत्नीवर विरोधकांकडून खोटे आरोप करण्‍यात येत आहेत. माझी पत्नी सरकारच्या कोणत्याच प्रशासकीय कामात सहभागी होत नाही. ज्यांनी-ज्यांनी खोटेनाटे आरोप केले आहेत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार, एकालाही सोडणार नाही, असा सज्‍जड इशारा मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

दाबोळी विमानतळावर पत्रकारांनी त्‍यांना ‘आप’च्‍या नेत्‍यांनी केलेल्‍या आरोपांविषयी विचारले असता ते म्‍हणाले, नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक (Fraud) केल्‍याप्रकरणी पोलिस योग्‍य पद्धतीने तपास करत आहेत.

Cash For Job Scam: पत्नीवर आरोप करताच मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले, म्हणाले, एकालाही...
Cash For Job Scam : छुपे चेहरे समोर येणार? नोकरी घोटाळा प्रकरणात EDची चौकशी सुरु; केस फाइल्सची मागणी

आता ‘ईडी’ही तपास करेल. एकूणच प्रक्रिया निष्‍पक्षपणे सुरू आहे. विरोधक सैरभैर झाल्‍याने ते बेछूट आरोप करत आहेत. माझ्‍या २५ वर्षांच्‍या राजकीय कारकिर्दीत, असे कधीही खालच्‍या पातळीवरील आरोप झालेले नाहीत. अबकारी घोटाळ्यात जामिनावर बाहेर असलेल्‍यांनी असे आरोप बिलकूल करू नयेत, असेही मुख्‍यमंत्री ‘आप’च्या नेत्यांना उद्देशून म्‍हणाले.

Cash For Job Scam: पत्नीवर आरोप करताच मुख्यमंत्री विरोधकांवर बरसले, म्हणाले, एकालाही...
Cash For Job Scam नंतर गोव्यात जमीन घोटाळ्यांचा धुमाकूळ, रूपांतरणांविरुद्ध मजबूत ठराव करा; चोडणकरांचे पंचायतींना आवाहन

पार्सेकरांचा घरचा आहेर

दुसरीकडे मात्र, या प्रकरणावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लक्ष्मीकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) यांनी काही दिवसांपूर्वी रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. या प्रकरणात एजंटांना अटक करण्यात असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य नसल्याचे पार्सेकर म्हणाले होते.

पार्सेकर म्हणाले की, "पोलिस विभागाने योग्य तपासाशिवाय कोणालाही क्लीन चीट देऊ नये. एजंटांना अटक करण्यात आली असली तरी राजकीय सहभागाशिवाय हे शक्य झालेले नाही. माझ्या कार्यकाळात असे काही प्रकरण सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडले असते. हा घोटाळा म्हणजे तरुण पिढीवर होणारा अन्याय आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com