Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding Dainik Gomantak
गोवा

Rakul and Jackky Wedding: रकुल प्रीत आणि जॅकीला गोव्यात का करायचंय लग्न? समोर आले कारण

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding: दोघेही गोव्यातच लग्न करणार आहेत कारण हे ठिकाण त्यांच्यासाठी खूप खास आहे.

Pramod Yadav

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani Wedding

सध्या रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. दोघेही 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्नगाठ बांधणार आहेत. या लग्नाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, दोघेही गोव्यातच लग्न का करणार आहेत याचे कारण सांगितले आहे.

दोघेही गोव्यातच लग्न करणार आहेत कारण हे ठिकाण त्यांच्यासाठी खूप खास आहे.

पिंकविलाच्या सूत्रानुसार, रकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी गोव्यात लग्न करण्याचे सर्वात मोठे कारण सुंदर लोकेशन नसून, दोघांची प्रेमकहाणी गोव्यातच सुरू झाली होती त्यामुळे त्यांच्यासाठी गोवा खूप खास आहे.

रकुल आणि जॅकी परदेशात लग्न करणार होते. सहा महिन्यांतच त्यांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. मात्र, डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वेड इन इंडिया आवाहनानंतर दोघांनीही भारतातच लग्न करण्याचा निर्णय घेतला.

गोव्यात 19 आणि 20 फेब्रुवारीला प्री-वेडिंग फंक्शन्स होणार आहेत. यानंतर 21 फेब्रुवारीला रकुल जॅकीसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

दिल्ली टाइम्सच्या सूत्रानुसार, या दोघांना लग्न आणि कार्यक्रम खाजगी ठेवायचा आहे.

रकुल आणि जॅकी जवळपास 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही अनेकदा एकमेकांसोबत सुट्टीवर जातात. 2022 मध्ये तिच्या वाढदिवशी एक रोमँटिक फोटो पोस्ट करून रकुलने जॅकीसोबतच्या तिच्या नात्याची कबुली दिली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT