'आप'च ठरलं! गोव्यासह इतर दोन राज्यातील लोकसभा उमेदवारांची नावे निश्चित करणार

पक्ष हरियाणा, गोवा, गुजरात आणि दिल्लीमध्ये जागावाटपावर काँग्रेसशी चर्चा करत आहे, असा काही नेत्यांनीही खुलासा केल्याचे पीटीआयने वृत्त दिले आहे.
Arvind Kejriwal | Aam Aadmi Party
Arvind Kejriwal | Aam Aadmi PartyDainik Gomantak

Loksabha Election 2024 AAP Goa

आम आदमी पक्ष हरियाणा, गोवा आणि गुजरातमधील लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित करणार आहे. पक्षाच्या समितीने येत्या 13 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली आहे.

I.N.D.I.A. आघाडीतील काँग्रेससोबत जागावाटपावरुन झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आपने आसाममधील तीन लोकसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता या तीन राज्यातील उमेदवारांबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आपचे राष्ट्रीय सरचिटणीस संदीप पाठक यांनी पक्षाचे नेते मनोज धनोहर, भाभेन चौधरी आणि ऋषी राज यांना अनुक्रमे दिब्रुगड, गुवाहाटी आणि सोनितपूरमधून उमेदवारी जाहीर केली.

I.N.D.I.A. आघाडीतील घटक पक्षांसोबतच्या प्रदीर्घ चर्चांचा कंटाळा आल्याचे संदीप पाठक पत्रकार परिषदेत म्हणाले.

पक्ष हरियाणा, गोवा, गुजरात आणि दिल्लीमध्ये जागावाटपावर काँग्रेसशी चर्चा करत आहे, असा काही नेत्यांनीही खुलासा केल्याचे पीटीआयने वृत्त दिले आहे.

Arvind Kejriwal | Aam Aadmi Party
सभापतींच्या मनाचा मोठेपणा! महाराष्ट्रातील अनाथ भावंडांना रमेश तवडकर घर बांधून देणार

दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये जागावाटपाबाबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत, पण आपचे सरकार असलेल्या पंजाबमधील 13 लोकसभा जागांसाठी आप चर्चा टाळत आहे, असे वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिले आहे.

दरम्यान, आप पंजाबमध्ये कोणाशीही युती न करता स्वबळावर निवडणूक लढवेल, अशी माहिती गुरुवारी पक्षाने दिली.

लोकसभा निवडणूक अगदी जवळ आली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागेल आणि खूप काम करावे लागेल, असा संदेश पाठक यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com