Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: उमेदवारीचा पेच; भाजपसह काँग्रेसला हवा आणखी वेळ!

Goa Congress: भाजपतर्फे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण, याचे उत्तर प्रदेश पातळीवर उपलब्ध नाही.

दैनिक गोमन्तक

Goa Congress:

भाजपतर्फे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून उमेदवार कोण, याचे उत्तर प्रदेश पातळीवर उपलब्ध नाही. आज, सोमवारी भाजपच्या गाभा समितीची राष्ट्रीय पातळीवर बैठक झाली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची उद्या, मंगळवारी बैठक होईल, असे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचीही उद्या बैठक होणार आहे. यामुळे भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा एकाचदिवशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

भाजपचे निवडणूक प्रभारी आशिष सूद हे आज सायंकाळी राज्यात पोचले आहेत. उद्या सकाळी ते पणजीतील कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत प्रमुख

नेत्यांची निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार आहेत. उमेदवारांचा दौरा, मुख्यमंत्र्यांचा दौरा, प्रदेशाध्यक्षांचा दौरा असे विषय या बैठकीत चर्चेला येणार आहेत.

भाजपने उत्तर गोव्यातून केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता दक्षिण गोव्यातून कोण, हाच प्रश्न शिल्लक आहे.

आज प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दक्षिण गोव्यातून केवळ महिलेच्‍याच नावाचा विचार उमेदवारीसाठी केला जाईल का,

असे विचारल्यावर सर्व पर्याय खुले आहेत, असे उत्तर दिले. काँग्रेसने उत्तर व दक्षिण गोव्यातून उमेदवारी जाहीर केलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lashkar e Taiba Commander Encounter: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा एन्काउंटरमध्ये ढेर! 527 दिवसांचा थरार संपला; भारतीय सैन्याची मोठी कारवाई VIDEO

Viral Video: ट्रेन थांबली नसती तर... सेकंदाचा खेळ अन् घडला भयंकर प्रकार; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ तूफान व्हायरल

India vs Pakistan: एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा होऊ शकते भारत-पाकिस्तानची टक्कर! वर्ल्ड कप 2027 चं संपूर्ण गणित जाणून घ्या

Canacona Water Crisis: काणकोणमधील बंधारे अद्याप खुलेच; नद्या-नाले कोरडे, पाणीटंचाईचे संकट गडद

Municipal Election: पालिका प्रभागरचनेची घाई; सरकार-निवडणूक आयोग आमनेसामने, '24 तासांत काम कसे करणार?'

SCROLL FOR NEXT