CM Pramod Sawant: जनतेच्या आशीर्वादाने कार्यकाळ पूर्ण करणार

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांनी मांडला पाच वर्षांचा लेखाजोखा
Goa Today's Live Update| Goa Politics | CM Pramod Sawant
Goa Today's Live Update| Goa Politics | CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant:

पक्ष श्रेष्ठींचा विश्‍‍वास आणि जनतेचा आशीर्वाद या बळावर मुख्यमंत्रिपदाचा उर्वरित कार्यकाळ मी निश्‍चितच पूर्ण करेन. हे करतानाच ‘विकसित गोवा’ हे ध्‍येय साधताना त्यावर माझा ठसा उमटवेन, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोमन्तक टीव्हीवरील ‘सडेतोड नायक’ या कार्यक्रमात व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने गोमन्तकचे संपादक-संचालक राजू नायक यांनी त्‍यांची मुलाखत घेतली.

मुख्यमंत्री सावंत यांनी 2027 पर्यंतचा आपला कार्यकाळ पूर्ण केला तर सलग आठ वर्षे मुख्यमंत्री राहणारे स्व. भाऊसाहेब बांदोडकर, स्व. शशिकला काकोडकर आणि प्रतापसिंह राणे यांच्या रांगेत ते जाऊन बसणार आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले, स्व. मनोहर पर्रीकर यांनी मला ‘ये लंबे रेस का घोडा है’ असे म्हटले होते. त्‍यांच्‍याच आशीर्वादाने राजकारणात आलो आणि इथवर प्रवास केला. सुरूवातीला काहींना मुख्यमंत्रिपदाची याला लॉटरी लागली असेच वाटले. पण २०२२ मध्ये जनतेने माझ्यावर विश्वास टाकला आणि सर्वांना मी जनतेचा मुख्यमंत्री आहे हे समजून चुकले.

Goa Today's Live Update| Goa Politics | CM Pramod Sawant
CM Pramod Sawant: सावली झुगारली, मेहनतीने उमटवला ठसा!

राष्ट्र प्रथम, त्यानंतर राज्य व राज्यातील जनता या न्यायाने जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर काम करत गेलो. त्याचमुळे शनिवारीही अधिकारी गावोगावी जाऊ लागले. आयएएस, आयपीएस. आयएफएस सेवेतील अधिकारी गाव पातळीवर जाऊ लागले.

राज्याचे मुख्य सचिव गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी गावांत जाऊ लागले. हे सारे मी स्वतः एकही दिवस सुट्टी न घेता काम करत असल्यानेच शक्य झाले. कोणताही धोरणात्मक निर्णय घेताना नेहमीच राज्याचे हित पाहतो, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

राज्यात येत्या पाच वर्षांत रोजगाराच्या दोन लाख संधी निर्माण होतील असे सांगून मुख्‍यमंत्री म्हणाले, पर्यटनवृद्धीसाठी कारावान, होम स्टे धोरणे मंजूर केली. आध्यात्मिक पर्यटनाकडे रोख वळवला. यात लोकांनी सहभागी झाले पाहिजे. सरकार सुविधा निर्माण करेल, मात्र त्याचा लाभ जनतेने घेतला पाहिजे.

Goa Today's Live Update| Goa Politics | CM Pramod Sawant
Goa Crime News: जमिनीचा वाद, ठोशाचा मार; भाटपाल-काणकोणात 1 ठार

भविष्याचा विचार करून सौर उपकरणे दुरुस्ती अभ्यासक्रम आयटीआयमध्ये सुरू केला आहे. सरकार कौशल्य विकासावर भर देत आहे. त्यातही युवकांनी सहभागी झाले पाहिजे. पाठ्यवेतन योजना सर्व सरकारी खाती व खासगी क्षेत्रात राबवली जात आहे. नोकरी म्हणजे केवळ सरकारी नोकरी ही संकल्पना डोक्यातून काढून टाकली पाहिजे.

नवे शैक्षणिक धोरण पूर्व प्राथमिक व उच्च शिक्षण पातळीवर राबवण्यात गोवा हे देशातील अग्रेसर राज्य असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे म्हणणे असल्याचे नमूद करून सावंत म्हणाले, ‘गोव्याचो दिष्टावो’ या यु-ट्यूब चॅनलचा वापर देशपातळीवर आता केला जातो. पूर्व प्राथमिक पातळीवरील अभ्यासक्रमही आम्हीच तयार केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com