Amit Palekar  Dainik Gomantak @AmitPalekar10/twitter
गोवा

गोव्याच्या राजकारणात भंडारी समाजाचे महत्व काय?

गोव्यातील राजकीय पक्षांनी नेहमीच संख्यात्मकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या भंडारींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

दैनिक गोमन्तक

आम आदमी पार्टी (AAP) ने 14 फेब्रुवारीला होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीसाठी 45 वर्षीय अमित पालेकर यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले आहे.
पालेकर भंडारी समाजाचे आहेत. हा गोव्यातील मोठा समाज आहे. 19 जानेवारी रोजी पालेकर यांना 'आप'चा मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित करताना, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले होते की, जातीचे राजकारण करण्यासाठी आम आदमी पार्टीने भंडारी मुख्यमंत्री चेहरा पुढे केलेला नाही, तर भंडारी समाजावर होत असलेला अन्याय संपवण्याचा हा प्रयत्न आहे. मोठे संख्याबळ असून देखील गोव्यातील राजकीय पक्ष भंडारी मुख्यमंत्री निवडत नाहीत. (Bhandari Community Significance in Goa Politics)

भंडारी कोण आहेत?

भंडारी समाजाचा पारंपारिक व्यवसाय ताडी काढणे आणि गाळणे, शेती आणि फळबागांमध्ये काम करणे हा आहे. हा समुदाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांसह गोवा (Goa) आणि महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पसरलेला आहे.

गोव्यात भंडारी समाजाची लोकसंख्या किती आहे?

गोमंतक भंडारी समाजाचे (जीबीएस) अध्यक्ष अशोक नाईक म्हणाले की, सध्याचा काळात गोव्यातील भंडारी समाजाच्या लोकसंख्येचे कोणतेही सर्वेक्षण झालेले नाही. ऑक्टोबर 2021 मध्ये गोवा विधानसभेत विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना, समाजकल्याण मंत्री मिलिंद नाईक म्हणाले होते की गोवा राज्य मागासवर्गीय आयोगाने 2014 मध्ये ओबीसींचे सर्वेक्षण केले होते. सर्वेक्षण अहवालानुसार, ओबीसींची लोकसंख्या 3,58,517 आहे. ही लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 27% आहे. या सर्वेक्षणानुसार भंडारी समाजाची एकूण संख्या 2,19,052 आहे. एकूण ओबीसी लोकसंखेच्या 61.10% लोक भंडारी आहेत.

2011 च्या जनगणनेनुसार, गोव्याची लोकसंख्या 14.59 लाख आहे, त्यापैकी 66.08 टक्के हिंदू, 25.10 टक्के ख्रिश्चन, 3.66 टक्के मुस्लिम आणि उर्वरित इतर धर्माचे आहेत. भंडारी लोकसंख्येचे योग्य सर्वेक्षण कधीच झाले नाही. अंदाजानुसार सध्या ही संख्या सुमारे 5.29 लाख असावी, जी राज्याच्या लोकसंख्येच्या किमान 30 टक्के असेल,” नाईक म्हणाले.

भंडारी समाजाची राजकीय पक्षांकडून उपेक्षा झाली आहे का?

गोव्यातील राजकीय पक्षांनी नेहमीच संख्यात्मकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या भंडारींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. काही राजकीय पक्षांनी समाजाला आरक्षण (Reservation) मिळावे यासाठी प्रयत्न केले आहेत. जीबीएस प्रमुखांनी यापूर्वी सांगितले होते की, भंडारी समाज त्याच पक्षाला पाठिंबा देईल जो समाजातील लोकांना जास्तीत जास्त उमेदवारी देईल. आता पर्यंत राज्याचे नेतृत्व करण्याची संधी समाजाला एकदाच मिळाली आहे. रवी नाईक हे एकमेव भंडारी समाजाचे मुख्यमंत्री झाले आहेत. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि आता भाजपसोबत आहेत. सध्या 40 सदस्यांच्या राज्य विधानसभेत भंडारी समाजाचे चार आमदार आहेत. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर भंडारी समाजाने भरपूर प्रगती केली आहे. मात्र, अजूनही बहुसंख्य लोक गरीब आहेत, असे अशोक नाईक म्हणाले.

भंडारी समाजातून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केल्याने 'आप'ला आगामी निवडणुकीत फायदा होईल का?

“गेल्या 60 वर्षात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाने आम्हाला मुख्यमंत्री पद देण्याचे आश्वासन दिले आहे. भंडारी समाजाचे नेते 'आप'ला (AAP) पाठिंबा देतील. मात्र पालेकर निवडणूक लढवत असलेल्या सांत क्रुज येथे भंडारी समाजाची लोकसंख्या कमी आहे.

राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे की, जीबीएसने पालेकरांना पाठिंबा दिला तरी पूर्ण समाजाचे एकमत होणे अवघड आहे. मागील 20 वर्षांपासून भंडारी समाजाचा भाजपशी (BJP) जवळचा संबंध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गोव्याचे राजकारण वेगळे आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि अजब गोव्याचे गजब राजकारण पुस्तकाचे लेखक संदेश प्रभुदेसाई यांचे म्हणणे आहे की, गोव्यातील मतदारांना जातीच्या आधारावर आकर्षित करण्याची पहिली घटना 1972 मध्ये घडली होती. मात्र ती असफल झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! T20 वर्ल्ड कप 2026चे वेळापत्रक जाहीर; भारत-पाकिस्तान महामुकाबला कधी?

Goa ZP Election 2025: जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी 'आप-आरजीपी' युतीचे संकेत; मनोज परब म्हणाले, 'सर्व पर्याय खुले'!

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

SCROLL FOR NEXT