Goa Election: अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची गोव्यात मांदियाळी

आज एकाच दिवशी मुरगाव, तालुक्यातील चारही मतदारसंघातून एकूण 29 अर्ज दाखल करण्यात आले.
Crowds of candidates today to fill up nomination forms for Goa assembly election in vasco
Crowds of candidates today to fill up nomination forms for Goa assembly election in vascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: गोवा विधानसभेच्या 14 फेब्रुवारी 2022 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज (गुरुवारी दि.27) चौथ्या दिवशी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची मंदियाळी ठरली. आज एकाच दिवशी मुरगाव, तालुक्यातील चारही मतदारसंघातून एकूण 29 अर्ज दाखल करण्यात आले. माजी मंत्री मिलिंद नाईक, आमदार कार्लुस आल्मेदा, एलिना साल्ढाणा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. (Crowds of candidates today to fill up nomination forms for Goa assembly election in vasco)

Crowds of candidates today to fill up nomination forms for Goa assembly election in vasco
गोवा सरकारचे उच्च न्यायालयासमोर नवीन प्रतिज्ञापत्र दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी Assembly Election उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवार दिनांक 21 पासून सुरू झाली. त्यानुसार पहिल्या दिवशी मुरगाव Mormugao तालुक्यातील चारही मतदार संघातून Constituency एकही उमेदवारी अर्ज दाखल न करण्यात आल्याने पाटी कोरी होती. नंतर अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशीही म्हणजे सोमवारी फक्त तीन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तर तिसऱ्या दिवशी मंगळवारी फक्त एक अर्ज दाखल करण्यात आला होता. अशाप्रकारे तीन दिवसात फक्त चार अर्ज दाखल करण्यात आले होते. यात माजी मंत्री माविन गुदिन्हो यांचा समावेश होता.

दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज चौथ्या दिवशी उमेदवारांची अर्ज भरण्याची मंदीयाळी ठरली. अर्ज भरण्यास आजी-माजी मंत्री तसेच नेत्यांनी आजच्या दिवसाची निवड केल्याने रवींद्र भवन बायणा येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपा, काँग्रेस, तृणमूल, अपक्ष उमेदवार कार्यकर्त्यांची जणू जत्राच भरली होती. यात भाजपा कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा होता. आपल्या नेत्या सोबत घेऊन अर्ज सादर करेपर्यंत कार्यकर्त्यांनी संयम बाळगून आपले आणि त्याला समर्थन दिले. उमेदवारी अर्ज सादर करून बाहेर येताच प्रत्येक उमेदवारांचे समर्थक कार्यकर्ते नारेबाजी, घोषणाबाजी करत होते. यामुळे बायणा रवींद्र भवन परिसर दणाणून गेला होता.

Crowds of candidates today to fill up nomination forms for Goa assembly election in vasco
जनतेप्रती असलेली जवळीक मला विजयी करणार: जेनिफर मोन्सेरात

दरम्यान उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आलेल्या काही उमेदवारांनी आपले अर्ज बरोबर भरलें असल्याने अर्ज दाखल होईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजले. त्यामुळे निर्वाचन अधिकाऱ्यांची तसेच निवडणूक अधिकारी वर्गाची, याच बरोबर बाहेर तैनात करण्यात आलेल्या पोलिस फौजफाट्यासह पत्रकारांचीही घालमेल झाली.

दरम्यान अर्ज भरण्याचा आज गुरुवार (दि.27) चौथ्या दिवशी मुरगाव मतदार संघातून एकूण पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात माजी मंत्री मिलिंद सगुण नाईक (भाजपा), संजय वसंत सातार्डेकर (भाजपा), संकल्प आमोणकर (काँग्रेस), श्रद्धा आमोणकर (काँग्रेस), निलेश महादेव नावेलकर (अपक्ष),

वास्को मतदारसंघातून एकूण 6 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यात कृष्णा साळकर (भाजपा), आंद्रे सेबास्तीयाव वियेगस ( रेव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी), मारुती शिरगावकर (शिवसेना), ॲण्ड्र्यू डिकुन्हा (अपक्ष), कार्लुस आल्मेदा (काँग्रेस), सैफ्कूला खान (तृणमूल काँग्रेस)

दाबोळी मतदारसंघातून एकूण ६ अर्ज दाखल करण्यात आले. यात कॅप्टन विरीयातो ( काँग्रेस), यांनी दोन अर्ज दाखल केले. गजानन बोरकर (रेवोल्युशनरी गोवन्स पार्टी), जुझे फिलिप डिसोझा (राष्ट्रवादी काँग्रेस) संदीप सुद (भाजपा), प्रेमानंद नानोस्कर (आम आदमी पार्टी),

कुठ्ठाळी मतदार संघातून 12 उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. यात माजी आमदार एलिना साल्ढाणा ( आप ), ऑलेन्सियो सिमाईश 2 अर्ज (काँग्रेस), आंतोन वाझ (अपक्ष), मारीयान रॉड्रिगीस 2 अर्ज (तृणमूल काँग्रेस), नारायण नाईक (भाजप), गिरीश पिल्ले 2 अर्ज (अपक्ष), शरण मेट्टी (अपक्ष), मेरसियाना वाझ ( अपक्ष), तियोतोनीओ कॉस्ता ( रेव्होल्यूशनरी गोवन्स पार्टी ).

निवडणुकीत सुरक्षा देणारे गृह विभागाचे अधिकारी पिण्याचे पाणी व जेवणापासून वंचित.

मुरगाव तालुक्यात विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वास्को बायणा येथील रवींद्र भवनात सुरू आहे. गुरुवार (दि.17) उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या चौथ्या दिवशी बहुतेक येणाऱ्या उमेदवारांनी आपले अर्ज मुरगावचे उपजिल्हाधिकारी तथा निर्वाचन अधिकारी दत्तराज गावस देसाई व निर्वाचन अधिकारी शर्मिला गावकर यांच्याकडे सादर केले आहे. मात्र गेल्या आठवड्यापासून बायणा रवींद्र भवन मध्ये उमेदवारी अर्ज सादर करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा देणारे गोवा विभागाचे पोलिस व केंद्रीय राखीव दलातील जवानांना पिण्याचे पाणी व जेवणापासून राज्य निवडणूक आयोगाने वंचित ठेवले असल्याची माहिती येथे उपस्थित असलेल्या गृह विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत मिळाली आहे. सदर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या गोवा पोलीस केंद्रीय राखीव दलाच्या महिला व पुरुष जवानांना उमेदवारी अर्ज सदस्य सादर करण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराच्या कार्यालयातर्फे पाणी देण्यात येते. मात्र मुरगाव निवडणूक आयोगातर्फे पाणी व जेवणापासून सुरक्षारक्षकांना वंचित ठेवले जाते. मात्र निवडणूक उपस्थितीत असलेले इतर अधिकारी वर्ग जेवणाचा पूर्णपणे आस्वाद घेत असतात, वगळून दोघेही निर्वाचन अधिकारी सदर सुरक्षेसाठी एक पोलिस उपअधीक्षक, दोन पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व अंदाजे 30 पेक्षा जास्त पोलीस, यात केंद्रीय राखीव दलाचे महिला, पुरुष 20 पेक्षा जास्त अधिकारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com