जनतेप्रती असलेली जवळीक मला विजयी करणार: जेनिफर मोन्सेरात

मंत्री म्हणून काम करत असताना ताळगाव मधील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना हव्या त्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत.
JENNIFER MONSERRATE
JENNIFER MONSERRATEDainik Gomantak

पणजी: भारतीय जनता पक्षाच्या (BJP) ताळगाव मतदारसंघाच्या उमेदवार व महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात (JENNIFER MONSERRATE) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ताळगाव मतदार संघात येणारे भाजपाचे नगरसेवक तसेच ताळगाव पंचायतीचे पंच यांच्या उपस्थितीत मोन्सेरात त्यांनी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर बोलताना जेनिफर मोन्सेरात म्हणाल्या की आपण ताळगाव मतदारसंघाचा भरीव विकास केलेला आहे.

JENNIFER MONSERRATE
गोंयकारवादी सरकार निवडा : विजय सरदेसाई

मंत्री म्हणून काम करत असताना ताळगाव मधील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना हव्या त्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. पणजी महापालिका क्षेत्रातील काही नगरसेवक ताळगाव मतदारसंघांमध्ये येतात . त्यांचे सहकार्य लाभले आहे. त्याच बरोबर ताळगाव जिल्हा पंचायत सदस्य आणि सरपंच, उपसरपंच, पंच यांच्या सहकार्याने आपला विजय निश्चित असल्याचे जेनिफर मोन्सेरात यांनी सांगितले .

JENNIFER MONSERRATE
Goa Politics:पांडुरंग मडकईकर यांनी सिद्धेश नाईक यांच्यावर निशाणा

भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गोव्याचा भरीव विकास केलेला आहे. त्यामुळे लोक पुन्हा एकदा भाजपाला सत्ता बहाल करतील. यात तिळमात्र शंका नसल्याचे सांगून आपला विजय 100 टक्के होणार असल्याचा विश्‍वास आपणाला आहे. ताळगावमधील मतदार हे माझे जवळचे मतदार असून त्यांच्या विश्वासावरच आपण जिंकणार असल्याचे सांगून आपणास भाजपची उमेदवारी दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे व संघटन सचिव सतीश धोंड यांचे जेनिफर मोन्सेरात यांनी यावेळी आभार व्यक्त केले. विरोधक किती आहेत व कोण आहेत याबाबत आपण विचार करत नाही. आपला प्रचार अनेक दिवसापासून सुरू असून लोकांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांप्रती असलेली आपली जवळीक आपणाला विजयी करण्यास सहाय्यभूत ठरणार असल्याचे जेनिफर मोन्सेरात शेवटी म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com