Bandra Terminus - Madgaon Express Western Railway X Handle
गोवा

Bandra Terminus - Madgaon Express: वसईला 25 मिनिटांचा थांबा का? वांद्रे- मडगाव प्रवासातील वेळेचं गणित समजून घ्या

Bandra Terminus - Madgaon Express Distance Travel Time: वांद्रे टर्मिनस - मडगाव एक्सप्रेसची नियमित सेवा येत्या 04 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे.

Pramod Yadav

Bandra-Madgaon Express Why 25-minutes train halt at Vasai

पणजी : मुंबईतून गोव्याला जाणाऱ्या नव्या वांद्रे टर्मिनस - मडगाव एक्स्प्रेसला गुरुवारी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांनी हिरवा कंदील दाखवला. या रेल्वेगाडीमुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना गोव्यात जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला असला तरी प्रवासासाठी अतिरिक्त वेळ जाणार आहे. वांद्रे टर्मिनस येथून सुटणारी ही एक्सप्रेस वसई येथे तब्बल २५ मिनिटे थांबा घेणार असून गोव्यात पोहोचण्यासाठी १४ ते १६ तासांचा वेळ लागणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांना १० ते १२ तासांचा वेळ लागतो.

पश्चिम रेल्वेच्या वतीने मुंबईतून गोव्यात जाणाऱ्या नव्या वांद्रे टर्मिनस - मडगाव एक्सप्रेसचा गुरुवारी (२९ ऑगस्ट) शुभारंभ केला. आठवड्यातून दोन दिवस धावणाऱ्या या एक्सप्रेसचा कोकणात जाणाऱ्या प्रवशांना फायदा होणार आहे.

वांद्रे टर्मिनस - मडगाव एक्सप्रेसची नियमित सेवा येत्या ०४ सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. वांद्रे येथून दर बुधवार आणि शुक्रवार तर मडगाव येथून दर मंगळवार आणि गुरुवारी ही एक्सप्रेस सुटेल. पारंपरिक मध्य रेल्वेच्या मार्गावरुन धावणारी मुंबई - गोवा ट्रेन पश्चिम रेल्वेवरुन धावणार असल्याने मार्गावर काही तांत्रिक समस्या आहेत.

वसई स्थानकावर २५ मिनिटांचा थांबा का?

वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस वसईत २५ मिनिटे थांबा घेणार आहे. यामागे तांत्रिक कारण आहे. वांद्रे टर्मिनसवरुन सुटणारे एक्सप्रेस बोरिवलीतून वसईत येईल. तिथून ही एक्सप्रेस दिवा-वसई मार्गे पनवेलच्या दिशेने जाईल. भौगोलिक परिस्थिती पाहता इंजिनची दिशा बदलावी लागेल आणि यासाठीच २५ मिनिटांचा वेळ लागणार आहे. यामुळे पुढच्या प्रवासाचा वेळ देखील वाढणार आहे.

वसईतील २५ मिनिटांचा थांबा पडकून ट्रेनच्या मडगाव पोहोचण्यासाठी १४ ते १५ तासांचा वेळ लागू शकतो. त्याचवेळी मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टीळक टर्मिनस आणि वसईतून मडगावला जाणाऱ्या ट्रेनला १० ते १२ तासांचा वेळ लागतो.

कोकणात किंवा दक्षिण भारतात जाणाऱ्या हॉलिडे स्पेशल यासारख्या फार थोड्य रेल्वेगाड्या मध्य मुंबई किंवा वांद्रे टर्मिनस येथून जातात. या ट्रेन्सचा वसईत मार्ग बदलाच्या तांत्रिक कामामुळे विलंब होतो.

Mumbai Train Map

५.७३ किमी मार्गाचा प्रकल्प वेळ वाचवू शकेल

वसईत होणाऱ्या विलंबावर उपाय काढण्यासाठी पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेला जोडणारा मार्ग नायगाव - जूचंद्र येथे निर्माण करण्याची गरज आहे. याबाबत २०१८ मध्ये प्रस्ताव देखील मांडण्यात आला होता. या जोड मार्गामुळे वसई - दिवा -पनवेलवरुन ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर जातील.

रेल्वे मंडळाकडून यासाठी मंजुरी देखील मिळाली पण, यासाठी भूमी अधिग्रहण अद्याप झालेली नाही. राज्य सरकारला याबाबत संपर्क साधण्यात आल्याचे, पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

५.७३ किमी या मार्गासाठी रेल्वे उड्डाणपूल उभारला जाईल. १७६ कोटींच्या या रेल्वे लाईनमुळे रेल्वे बाह्यमार्गाने वळवता येणार आहेत. यासाठी दोन वर्षांचा वेळ लागू शकतो. गेल्या १० ते १२ वर्षापासून या लाईनसाठी मागणी केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T-20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपमध्ये बांगलादेशची एन्ट्री! 'या' देशाच्या स्वप्नांचा केला चुराडा

Magh Purnima 2026: कष्टाचं फळ मिळणार अन् कष्ट दूर होणार! माघ पौर्णिमेला 5 शुभ योगांचा महासंयोग; 'या' राशींच्या सुवर्णकाळाची सुरुवात

Video: 'अभिषेक झाला, सूर्या झाला'! भारताचा 'हा' फलंदाज आता चोपणार न्यूझीलंडला; प्रॅक्टिसचा व्हिडीओ झाला Viral

Russia Train Attack: 'काळ्या धुराचे लोट अन् रडणाऱ्या प्रवाशांचा आक्रोश'! रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनची रेल्वे सेवा उद्ध्वस्त; 12 जणांचा मृत्यू Watch Video

Shadashtak Yog 2026: "जुनी कर्जे फिटणार, आनंदाचे दिवस येणार!" मंगळ-गुरुचा महासंयोग 'या' राशींसाठी ठरणार भाग्योदयाची नवी पहाट

SCROLL FOR NEXT