ज्ञानपीठ विजेत्या लेखकाचं मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य, गोव्यात उफाळला कोकणी विरुद्ध मराठी वाद

Damodar Mauzo: गोव्याच्या राजभाषा कायद्यात मराठीचा समावेश नको, असे वादग्रस्त विधान कोकणी साहित्यिक मावजो यांनी केले.
ज्ञानपीठ विजेत्या लेखकाचं मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य, गोव्यात उफाळला कोकणी विरुद्ध मराठी वाद
Konkani Writer Damodar Mauzo
Published on
Updated on

पणजी: गोव्यात कोकणी विरुद्ध मराठी यांच्यातील शीतयुद्ध नेहमीच पाहायला मिळाले आहे. दोन्ही भाषिकांच्या चळवळीचा येथील इतिहास देखील मोठा आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोकणी लेखक दामोदर मावजो यांनी मराठीबाबत नुकत्याच केलेल्या वक्तव्यावरुन गोव्यात कोकणी विरुद्ध मराठी वादाला तोंड फुटले आहे.

गोव्याच्या राजभाषा कायद्यात मराठीचा समावेश नको, असे वादग्रस्त विधान कोकणी साहित्यिक मावजो यांनी केले. राज्यातील मराठीप्रेमींनी या विधानाचा तीव्र निषेध केला.

दामोदर मावजो यांच्या वक्तव्यानंतर गोव्यातील मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच, मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तालुका पातळीवर मराठीप्रेमी एकवटू लागले आहेत.

राज्यात मराठीप्रेमी संस्थांनी पत्रकार परिषद घेऊन तसेच, वैक्तिगत पातळीवर मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. शिवाय आज (३० ऑगस्ट) राज्यात ठिकठिकाणी निषेध आंदोलन आयोजित करण्यात आली आहेत.

काय म्हणाले दामोदर मावजो?

'सरकारी कामकाज केवळ कोकणीतूनच व्हावे. यासाठी राजभाषा कायद्यात कोकणीचा समावेश असावा, मराठीचा समावेश असू नये', असे मत मावजो यांनी व्यक्त केले.

'जी भूमीची भाषा तीच राजभाषा हे तत्व राजभाषा ठरविताना वापरले जाते. संपूर्ण देशात राजभाषा ठरविताना हेच तत्व आतापर्यंत अमलात आणले गेले. कुठल्याही राज्याने दोन भाषांना राजभाषा कायद्यात स्थान दिले नाही. गोवाही त्यास अपवाद होऊ शकत नाही. त्यामुळे मराठी भाषेला गोव्याच्या राजभाषा कायद्यात स्थान असूच शकत नाही', अशी भूमिका साहित्यिक दामोदर मावजो यांनी मांडली.

ज्ञानपीठ विजेत्या लेखकाचं मराठीबाबत वादग्रस्त वक्तव्य, गोव्यात उफाळला कोकणी विरुद्ध मराठी वाद
Damodar Mauzo: 'सरकारी कामकाज केवळ कोकणीतूनच...', मावजोंच्या वक्तव्यावरुन उसळली संतापाची लाट; समाज माध्यमांवरही उमटले पडसाद

मावजो यांच्या वक्तव्यावर मराठी प्रेमी काय म्हणाले?

दामोदर मावजो यांच्या वक्तव्याने गोव्यात संतापाची लाट पसरली आहे. मराठीप्रेमी मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध करत आहेत.

'गोव्यात भाषिक सौदार्हाचे वातावरण असताना मावजो यांनी केलेले वक्तव्य द्वेष पसरविणारे आहे. तसेच, पुन्हा भाषावादाचे भूत जिंवत करणारा प्रकार आहे', असे गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत म्हणाले.

'मराठी अस्मिता सत्तरी यांच्याकडून देखील मावजो यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. मावजो यांनी मराठी भाषेच्या अस्तित्वाचा अभ्यास करावा. गोव्याचा सांस्कृतिक इतिहास, शिलालेख मराठीत आहेत हे विसरुन चालणार नाही', अशी प्रतिक्रिया मराठी अस्मिता सत्तरी यांनी दिली.

मावजो यांचे वक्तव्य मराठीचा अवमान करणारे आहे, असे मत मराठी राजभाषा प्रस्थापन समितीने नोंदवले. तसेच, मराठी आणि रोमी कोकणी यांनाच राजभाषेचे स्थान देणारे विधेयक संमत करावे, असे गो. रा. ढवळीकर म्हणाले आहेत.

गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर यांनी मावजो यांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला. ज्ञानपीठकारांनी त्यांच्या भाषेचे काय ते बघावे. मराठीवर विनाकारण दुगाण्या झाडू नये, असा सबुराचा सल्ला आम्ही देत आहोत, असे आमोणकर म्हणाले.

रोमी कोकणीचा वाद काय?

राजभाषा कायद्यात दुरुस्ती करण्याची मागणी रोमी कोकणीचे समर्थक कॅथलिक बांधव करत आहेत. देवनागरी कोकणी अवैध पद्धतीने आणि अ लोकशाही पद्धतीने लादण्यात आल्याचे समर्थकांचे मत आहे.

दरम्यान, मावजो यांच्या वक्तव्याने मराठीबाबत देखील तोच अन्याय झाल्याचे मराठी प्रेमी म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com