Cleaning Campaign Dainik Gomantak
गोवा

Cleaning Campaign: भुईपालमध्ये स्वच्छता मोहिमेने नववर्षाचे स्वागत

शाळकरी मुले, युवक तसेच महिलांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भुईपाल, सुंदर भुईपाल’ चा नारा देत अंतर्गत भागातील रस्त्यांलगतचा कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.

दैनिक गोमन्तक

Cleaning Campaign: एरवी नववर्ष स्वागताचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी सहलीचा बेत आखतात. परंतु या दिवसाचे औचित्य साधून होंडा पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9च्या पंच सदस्या स्मिता मोटे यांच्या पुढाकाराने आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी येथील शाळकरी मुले, युवक तसेच महिलांनी एकत्र येऊन ‘स्वच्छ भुईपाल, सुंदर भुईपाल’ चा नारा देत अंतर्गत भागातील रस्त्यांलगतचा कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला.

सदर स्वच्छता अभियानाची सुरूवात येथील लईराई धोंड बांधवांच्या सभागृहाचा परिसर साफ करून करण्यात आली, त्यानंतर वाड्यावरील तसेच डोबवाडा या भागातील रस्त्याच्या बाजूला पडलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या, कागद, कपड्यांचे तुकडे, प्लास्टिकच्या व काचेच्या बाटल्या,असा कचरा गोळा करून नागरिकांना कचरा रस्त्यावर न टाकता त्याची योग्य विल्हेवाट लावावी, असे आवाहन केले.

या वेळी सुमारे दहा पिशव्या कचरा गोळा केला. येत्या काळात कचरा निर्मूलन मोहिमेला सुरुवात करताना तज्ज्ञांचा मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी भेडशेवाडा व डोबवाडा या दोन वाड्यावर सफाईची मोहीम राबविण्यात आली, नंतर चोडणकर नगर व भुईपाल चेकपोस्ट वाड्यावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे,असे पंच सदस्या स्मिता मोटे यांनी सांगितले.

सध्या सर्वत्र कचऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे आमचा गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून भुईपाल प्रभाग क्रमांक 9 मध्ये येणाऱ्या सर्व वाड्यांवर ‘स्वच्छ भुईपाल, सुंदर भुईपाल’ अभियान राबविण्यात येणार आहे, या अभियानास प्रभागातील युवा व महिला वर्गाचा पूर्ण पाठिंबा लाभत आहे.-स्मिता मोटे, पंचसदस्या

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा एकदम दणक्यात! सरकारकडून महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची घसघशीत वाढ; मिळालं तगडं गिफ्ट

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

SCROLL FOR NEXT