Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: गोव्यात पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याकडून ‘यलो अलर्ट’

Goa Weather Update: हवामान खात्याच्या माहितीनुसार, १५ ते २० ऑगस्ट २०२५ या काळात उत्तर आणि दक्षिण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Pramod Yadav

Goa Monsoon 2025

पणजी: गोव्यात हवामान खात्याने २० ऑगस्टपर्यंत यलो अलर्ट जारी केला असून, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसांना राज्यात विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज आहे. दोन्ही जिल्ह्यात जोरदार सरी बरसण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० ऑगस्ट २०२५ या काळात उत्तर आणि दक्षिण गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात ३० ते ४० प्रतितास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

आज राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहण्यास मिळाले, पण किरकोळ सरी वगळता कुठे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही.

हवामान खात्याच्या ताज्या अपडेटनुसार, दोन्ही जिल्ह्यात पुढील तीन तासांत हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर गोव्यात काही ठिकाणी तर दक्षिण गोव्यात धारबांदोडा आणि सांगे तालुक्यात पावसाचे ढग असून, पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या चोवीस तासांत धारबांदोडा येथे ७६.६ आणि फोंडा येथे ६५.८ मिली मिटर पावसाची नोंद झाली. तसेच, म्हापसा येथे २१, काणकोण ५०.४, साखळी ४५.८, ओल्ड गोवा ४०.४, सांगे ३८.६, पणजी २३.८, मुरगाव २२.६ आणि पेडणे २०.८ आणि दाबोळी येथे १४ मिमि पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Express: प्रवास घाईचा नाही, तर 'चवीचा'! मुंबई-गोवादरम्यान धावणारी फूड क्वीन 'मांडवी एक्सप्रेस'; खवय्यांसाठी का आहे स्वर्ग?

Donald Trump: "इराणला जगाच्या नकाशावरुन पुसून टाकू!" डोनाल्ड ट्रम्प यांची खुलेआम धमकी; लवकरच पडणार युद्धाची ठिणगी? VIDEO

Chimbel Unity Mall: चिंबल प्रकल्पांवरुन पेच कायम! 'प्रशासन स्तंभ' रद्द करण्याचे संकेत, मात्र 'युनिटी मॉल'बाबत मुख्यमंत्री ठाम

High Court: "सनातन संपवण्याची भाषा म्हणजे नरसंहाराला चिथावणी" निवडणूक वर्षात उदयनिधि स्टालिन यांना हायकोर्टाकडून चपराक!

"मुक्या प्राण्यांच्या जिवाची इतकीच किंमत का?" मर्सिडीजनं कुत्र्याला चिरडलं, कोर्टानं केली 150 रुपयांत सुटका! प्राणीप्रेमींचा संताप

SCROLL FOR NEXT