ED Raid: कर्नाटक ते गोवा, मुंबई, दिल्लीत... ईडीचे छापे, काँग्रेस आमदाराच्या घरातून 1.68 कोटी रोख आणि 6.75 किलो सोने जप्त

MLA Satish Sail ED Raid: छापेमारीदरम्यान ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे, ई-मेल, रेकॉर्ड, १.६८ कोटी रुपये रोख, ६.७५ किलो सोने (दागिने आणि बिस्किटे) जप्त केले आहेत.
Gold and cash seized in ED raid | Enforcement Directorate action news
ED raid Congress MLA | Karnataka Goa Mumbai Delhi ED raidsDainik Gomantak
Published on
Updated on

कर्नाटक: अंमलबजावणी संचालनालय (ED) बेंगळुरूने १३ आणि १४ ऑगस्ट २०२५ रोजी कारवार (उत्तर कन्नड), गोवा, मुंबई आणि नवी दिल्ली येथे मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) छापेमारी केली. आमदार सतीश कृष्ण सैल उर्फ सतीश सैल आणि इतर व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली.

बेंगळुरूच्या खासदार-आमदार (MP / MLA) यांच्यासाठी असलेल्या विषेश न्यायालयाने या सर्वांना बेकायदेशीरपणे लोहखनिजाच्या निर्यातीबद्दल दोषी ठरवले होते. छापेमारीदरम्यान ईडीने अनेक महत्त्वाची कागदपत्रे, ई-मेल, रेकॉर्ड, १.६८ कोटी रुपये रोख, ६.७५ किलो सोने (दागिने आणि बिस्किटे) जप्त केले आहेत.

ED, Bengaluru search operation
ED, Bengaluru search operationDainik Gomantak

याशिवाय, सुमारे १४.१३ कोटी रुपयांची बँक बॅलन्स रक्कम गोठवण्यात आली आहे. सैल हे उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com