Water supply

 

Dainik Gomantak

गोवा

आजपासून पणजीतील पाणीपुरवठा सुरळीत...

आजपासून सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्‍याने सांगितले.

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्तर गोव्यातील भोम-बाणास्तरीजवळ तिसवाडीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे पणजी, ताळगाव, सांताक्रुझ, सांतआंद्रे, बांबोळी आणि परिसरात गेल्‍या दोन दिवसांपासून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत ही जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. अखेर गुरुवारी सकाळी पाणीपुरवठा विभागाला जलवाहिनी दुरुस्त करण्यात यश आले. दुपारी पाणी आले पण ते खूपच गढूळ होते. आजपासून सुरळीत पाणीपुरवठा सुरू होईल, असे पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्‍याने सांगितले.

जलवाहिनी दुरुस्त झाल्यानंतर तात्‍काळ पाणी सोडण्यात आले. मात्र ते मर्यादित होतेच शिवाय गढूळ होते. आता या जलवाहिनीचे काम पूर्णत: मार्गी लागल्‍याने उद्यापासून सुरळीत पाणीपुरवठा होणार आहे. दरम्यान, आज पाण्‍याचा दाब खूपच कमी असल्‍याने इमारतीच्‍या वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या लोकांना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्‍यांची गैरसोयच झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT