Water Shortage in Ponda File Photo
गोवा

Water Shortage in Ponda: फोंड्यात अनियमित पाणीपुरवठा; नागरिकांमध्ये संताप

राज्यातील जलसाठे कोरडे पडल्याने चिंतेचा विषय

दैनिक गोमन्तक

Water Shortage in Ponda: फोंडा शहरात गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित व नियमित होत नसल्याने फोंडावासीयांनी पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते विराज सप्रे म्हणाले की, स्थानिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रवी नाईक यांच्याकडे फोंडा शहरातील स्थानिकांसाठी अतिरिक्त पाण्याची टाकी उभारण्याची विनंती केली आहे.

सेंट मेरी हायस्कूल येथे पाण्याची टाकी आहे; परंतु सध्या मर्यादित पाणीपुरवठा आणि नळाच्या पाण्याचा दाब नसल्यामुळे त्यांना पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. उंच इमारतीत राहणाऱ्या स्थानिकांना पाणी मिळण्यात अडचण येत असून त्यांनी दाग-फोंडा येथील सार्वजनिक पाणी विभागाला कळविले आहे, असे सप्रे यांनी सांगितले.

गेल्या तीन दिवसांपासून फोंडा शहरात पाण्याचे भीषण संकट उभे आहे. गोव्यात सध्या जलसाठे, धरणे कोरडी पडली आहेत. म्हैसाळ धरणाची पातळी जमिनीवर आल्यानंतर शिरोडा आणि पंचवाडी स्थानिकांनाही जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. त्यांना ओपा प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो, अशी माहिती मिळाल्याचे सप्रे यांनी सांगितले.

म्हैसाळ येथील धरण कोरडे पडल्यानंतर ओपाचे पाणी शिरोडा, येथे वळविण्यात आल्याने फोंडा येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. फोंड्यातील राजकारणी राजकारणात व्यस्त असल्याने त्यांना सामान्य लोकांचे पडलेले नाही. पाणीटंचाईमुळे लोक किती त्रस्त आहेत याची त्यांना मुळीच कदर नाही. चार वर्षांपूर्वी फोंडा येथे नवीन पाण्याची टाकी प्रस्तावित केली होती. कामाचा शुभारंभही केला होता; पण आज टाकीही नाही आणि आम्हाला पाण्याचा दाबही नाही.

ओपाचे पाणी थेट सेंट मेरी हायस्कूलजवळील पाण्याच्या टाकीपर्यंत पोहोचते आणि नंतर फोंडा शहरातील विविध भागांना पुरवले जाते. या टाकीतून पंचवाडी व शिरोडा येथेही पाणीपुरवठा केला जातो, त्यामुळे फोंडा शहरात पाण्याचा खेळ चालू आहे.

- विराज सप्रे, सामाजिक कार्यकर्ते

म्हैसाळ धरणाचे दीड ते दोन एमएलडी पाणी सध्या पंचवाडी या एकाच गावात दिले जात आहे. आजपर्यंत या धरणाचे पाणी कमी होत नव्हते. यंदा ही परिस्थिती उद्भवली आहे. पाऊस आला नाही तर पंचवाडी भागात पाण्याची टंचाई होण्याची शक्यता आहे आणि असे झाल्यास ओपा प्रकल्पातून त्यांना पाणीपुरवठा केला जाईल.

- शैलेश नाईक, जलस्रोत खात्याचे साहाय्यक अभियंता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Bollywood: रामायणाची 'स्टार कास्ट' उघड! रणबीर कपूर, साई पल्लवी सोबत 'हे' कलाकार साकारणार महत्वाच्या भूमिका

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT