Big B’s granddaughter Navya Nanda spotted with rumoured BF
Big B’s granddaughter Navya Nanda spotted with rumoured BFDainik Gomantak

महानायक बच्चन यांची नात गोव्यावरून परतली पण तिच्या सोबतचा 'तो' कोण? चर्चा रंगली, व्हिडिओ व्हायरल

चित्रपटांत काम करत नसतानाही बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा नेहमीच चर्चेत असते.
Published on

Big B’s granddaughter Navya Nanda spotted with rumoured BF while returning from Goa: चित्रपटांत काम करत नसतानाही बिग बी यांची नात नव्या नवेली नंदा नेहमीच चर्चेत असते. नव्याचा साधेपणा सर्वांना खूप आवडतो. नव्या देखील तिच्या चाहत्यांसाठी नेहमी सोशल मिडियावर पोस्ट शेअर करत असते.

नव्याबाबत अलिकडे विविध अफवा समोर येत असून, तिचे कथितपणे सिद्धांत चतुर्वेदीसोबत अफेअर सुरू असल्याचा चर्चा समोर आल्या आहेत. दरम्यान, नुकताच नव्याचा सिद्धांतसोबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

नव्या आणि सिद्धांत चतुर्वेदी दोघेही या व्हिडिओ एकत्र दिसत असून, नव्या सिद्धांतसोबत विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहे.

नव्या आणि सिद्धांतचा हा व्हिडिओ वूम्प्ला वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धांत पांढरा टी-शर्ट, पँट आणि स्नीकर्समध्ये आहे. तर, नव्या सफेद टॉप आणि ब्लॅक लूज पॅन्टमध्ये दिसत आहे. सिद्धांतने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. हे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे.

Big B’s granddaughter Navya Nanda spotted with rumoured BF
वास्को MPT बर्थ क्रमांक आठ येथे अमोनिया वायूची गळती, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

वूम्प्लाने व्हिडिओ शेअर करताना, बिग बींची नात नव्या कथित बॉयफ्रेंडसोबत! असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे. मुळात नव्या चंदा आणि सिद्धांत चतुर्वेदी गोव्याहून एकत्र परत आल्यानंतर दोघांना मुंबई विमानतळावर एकत्र स्पॉट करण्यात आले.

नव्या नवेली नंदा सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर 920 हजार लोक तिला फॉलो करतात. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर लोकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओवर टिप्पणी करताना, लोकांनी दोघांच्या जोडीचे कौतुक केले आहे तर, काही जणांनी त्यांच्यावर टीका देखील केली आहे. सध्या तरी हा व्हिडिओला सोशल मिडियावर पसंती मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com