Panaji Water Shortage Gomantak Digital Team
गोवा

Panaji Water Shortage: राजधानीचा शेजार तहानलेलाच!

गोमन्तक डिजिटल टीम

अनिल पाटील

वाढलेले कडक ऊन, आटलेल्या विहिरी, व्यावसायिक कारणांसाठी वाढलेली पाण्याची मागणी, यामुळे राजधानी पणजी शेजारील भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असून पाण्यासाठीचा आक्रोश वाढला आहे.

साहजिकच पंचायत आणि सरकार विरोधात लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या पाणीटंचाईमुळे रहिवाशांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे.

पावसाळा सुरू होण्याला अद्यापही काही वेळ आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस उन्हाचा कडाका वाढत आहे. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी कमी झाली असून पाण्याची एकूणच मागणी वाढली आहे.

अशातच पर्यटन स्थळामुळे व्यावसायिक कामासाठी लागणाऱ्या पाण्यामुळे राज्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तीव्र पाणीटंचाई भासत असल्याचे चित्र आहे.

राजधानी पणजी शेजारील करंझाळे, ताळगाव, रायबंदर , कदंबा पठारावर पाण्यासाठीची ओरड वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत पुरवले जाणारे पाणी अत्यंत कमी असल्याने या भागातल्या नागरिकांना पाण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे.

काही ठिकाणच्या लोकांची तहान नोव्हेंबरपासून दररोज टँकरच भागवत आहे. आता विहिरी आणि कुपनलिका आटल्याने तीव्र पाणी टंचाई भासत आहे.

तर हवाई बीच परिसरातील विठू नुनीस म्हणाले, सरकारतर्फे प्राधान्याने व्यावसायिकांना पाणीपुरवठा केला जातो. त्यानंतर लोकांना पेयजल पुरवले जाते.

सहाजिकच हॉटेल व्यावसायिकांची पाण्याची तहान भागल्यानंतर आम्हाला पाणी येते. त्यामुळे ते कमीच असते. एप्रिल, मे महिन्यांमध्ये ही टंचाई तीव्र होते.

टँकरवरच सारे काही

आमचा 348 प्लॉटचा कॉम्प्लेक्स आहे. आमच्याकडे 3 विहिरी आणि 6 बोअरवेल आहेत. सध्या त्यांचे पाणी कमी झाले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याची पाण्याची 6 नळ जोडण्या आहेत. यावर पेयजलाची तहान भागते.

मात्र, इतर वापरासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. रोज 8 हजार लिटरचे 10 टँकर मागवले जातात. प्रति टँकर रु.800 द्यावे लागतात, असे मत सामाजिक कार्यकर्त्या सिसील रॉड्रिगीज म्हणाल्या.

कमी दाबाने पाणीपुरवठा

मार्टिन्स मोरोड येथील ख्रिस लोपस यांनी सांगितले, की आमच्या इथेही तीव्र पाणीटंचाई आहे. सरकारकडून नळाद्वारे पुरवले जाणारे पाणी अत्यंत कमी दाबाने पुरवले जात आहे.

त्यामुळे आमच्या सोसायटींना तीव्र पाणीटंचाई भासत आहे. आम्ही दररोज टँकर मागवत असून सध्या तरी टँकरवरच आमची भिस्त असून त्यावरच आमचे काम सुरू आहे.

आम्हाला सरकारकडून केवळ एक तास पाणी तेही कमी दाबाने मिळते. मात्र, ते पुरत नाही. या भागात अनेक घरकुल प्रकल्पांची बांधकामे सुरू आहेत.

त्यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे आम्हाला लागणारे पाणी टँकरनेही मिळत नाही. ही स्थिती गेल्या पाच वर्षांपासूनची आहे. या विरोधात सरकार दरबारी अनेकदा तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT