Morjim Water Shortage Issue Gomantak Digital Team
गोवा

Morjim Water Shortage Issue: पाण्यासाठी 3-4 किमी पायपीट, स्मार्ट गोव्यातील भीषण चित्र

महिलांचा सवाल : मोरजीत तीव्र पाणी टंचाई, घागर मोर्चाचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

Morjim Water Shortage Issue: एक दिवस जेवण नसेल, तरी जगता येते. परंतु पाण्याशिवाय एकही दिवस जगता येत नाही. पाण्यावरच सर्वकाही अवलंबून आहे. आम्हांला पाणी द्या.

पाण्यासाठी आम्ही कुठे कुठे वणवण करायची? निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात आश्वासने आणि इच्छुक उमेदवार टँकरद्वारे पाणीपुरवठा करायचे, ते टँकर गेले कुठे? असा सवाल मोरजी- शिरोडकरवाड्यातील महिला वर्गातर्फे करण्यात येत आहे.

निवडणुका झाल्या निवडून आले. आमदार झाले, सरपंच झाले, जिल्हा पंचायत सदस्य झाले, खासदार झाले, पण पाण्याचा प्रश्न काही सुटलेला नाही. नियमित नको, निदान दिवसाआड तरी हक्काचे पाणी किमान चार तास उपलब्ध करावे.

अन्यथा आम्हाला घागर मोर्चा नेण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा मोरजी पंचायत क्षेत्रातील शिरोडकरवाडा, कान्नाईकवाडा, तेंबवाडा या परिसरात पाण्यासाठी महिला एकत्रित येऊन इशारा दिला.

पाणी नसल्यामुळे आम्हांला न वापरात येणाऱ्या विहिरीचे आणि एखाद्या दुसऱ्या वाड्यावरून बोरिंगच पाणी आणावे लागत आहे.

हे पाणी आरोग्याला हानिकारक आहे, भविष्यात एखादी जर दुर्दैवी घटना घडली, तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार असेल, असा इशारा यावेळी महिलांनी दिला.

मोफत पाणी गेले कुठे?

नळाची बिल वेळेवर दिली जातात. सरकार एका जनतेला पाणी मोफत देण्याची घोषणा करते. त्या घोषणेनुसार पाणी का दिले जात नाही. मागच्या सहा महिन्यापासून आम्ही पाणी पाणी करून रस्त्यावर येतो.

पंच सरपंच आमदार अधिकारी यांना आमच्या कैफियती मांडत असतो. परंतु आम्हांला आमचे पाणी कुणी देत नाही. जर यापुढे आमचे पाणी आम्हांला मिळाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे, असेही महिलांनी सांगितले.

आश्‍वासनाकडे दुर्लक्ष

मोरजी पंचायत क्षेत्रात सहा महिन्यापासून पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ज्या पारंपारिक विहिरी पाण्याच्या होत्या, त्याही विहिरी आटल्या आहेत. काही जणांनी बोरिंग मारलेले आहे. त्याद्वारे पाणी मिळते, परंतु ते पाणी पिण्याच्या लायकीचे नसते.

अशा तक्रारी आहेत. यावर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाणीपुरवठा करण्यासाठी आम्हाला आश्वासन दिलेली आहेत, पण त्या आश्‍वासनाकडे दुर्लक्ष होत आहे.

टँकरही गायब

काही महिला म्हणाल्या, निवडणुकांपूर्वी मोठ्या प्रमाणात टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता, ते टँकर आता कुठे गायब झाले? असा सवाल करून काही वाड्यावर नियमित 24 तास पाणीपुरवठा असतो, तर मग आम्ही कुणाचे घोडे मारले म्हणून आम्हांला वेळेवर पाणी मिळत नाही, असा सवाल यावेळी महिलांनी उपस्थित केला.

लोकप्रतिनिधींनी विचार करावा

पाणी नसल्यामुळे दुसऱ्या वाड्यावरून तीन-चार किलोमीटर अंतरावर जाऊन एखाद्या बोरिंगच पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आम्हांला कष्ट करावे लागतात.

सरकारने याची गंभीर दखल घेऊन निदान दिवसाआड तरी पाणी ठरावीक वेळेत द्यावे, अशी मागणी या भागातील महिलावर्गांनी केली आहे.

आम्ही सरकारी नोकरी किंवा आम्ही सरकारकडे पैसे मागत नाही. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतो आहे. याचा लोकप्रतिनिधींनी विचार करावा, असेही ज्येष्ठ महिलांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

SCROLL FOR NEXT